Home चंद्रपुर जिल्हा विशेष उपविभागीय अधिकाऱ्यांची ‘नियुक्ती’ मात्र 1 महिना वेटिंग

उपविभागीय अधिकाऱ्यांची ‘नियुक्ती’ मात्र 1 महिना वेटिंग

806

“वरोरा उपविभागाला अधिकारी मिळाला कागदावर

तीन महिने झाले प्रभारीच चालवतायत कारभार

रवी खाडे

चंद्रपूर : वरोरा उपविभागाला अखेर उपविभागीय अधिकारी मिळाला आहे. अमर भीमराव राऊत यांची नेमणूक शासनाने केली असली, तरी ते प्रत्यक्ष कामावर हजर होणार आहेत एका महिन्यानंतर म्हणजेच सध्या फक्त “नेमणूक झाली” एवढाच दिलासा… बाकी काही नाही! या निर्णयामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजी दोन्ही आहे. “नेमणूक झाली पण अधिकारी कुठे?” असा सवाल आता उघडपणे विचारला जातोय.

.       गेल्या तीन महिन्यांपासून वरोरा उपविभाग फक्त प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरोशावर चालतोय. एप्रिल 2023 मध्ये शिवनंदा लंगडापुरे यांची नियुक्ती झाली होती, पण कार्यकाळ संपायच्या आतच त्यांची बदली झाली. त्यांच्यानंतर आलेले जेनीत चंद्रा यांचीही मार्च 2025 मध्ये बदली झाली. त्यानंतर कारभाराची सूत्रे फक्त तात्पुरत्या जबाबदारीवर चालत आहेत. अगदी कमी कालावधीत उपविभागीय अधिकारी बदलत असल्यामुळे अनेक बाबीना ब्रेक लागला आहे.

.        उपविभागीय अधिकारी हा महसूल, विकास, नियोजन या सगळ्याचा केंद्रबिंदू. पण इथे अधिकारीच नसल्याने कामे खोळंबलीत, फायली रेंगाळल्या आहेत, तसा वरोरा उपविभाग हा औद्योगिक दृष्टीने महत्वाचा असून या परिसरात कोळसा खाणी, व विविध प्रकल्प यामध्ये अडकलेले शेतकऱ्यांच्या शेतजमिनी चे प्रश्न सध्यातरी अंधातरी आहे. हे सर्व स्थैर्य उपविभागीय अधिकाऱ्यामुळे शक्य होणार आहे.

.       आता वरोरा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी म्हणून शासनाने अमर राऊत यांची नियुक्ती केली खरी… पण ते एक महिन्याने म्हणजेच 7 ऑगस्ट 2025 रोजी रुजू होणार आहे ? का? यामागे काही विशेष कारण आहे का? कुठलं ‘प्रशासकीय गणित’ सुरू आहे? ही माहिती शासनाने पारदर्शकपणे द्यावी, अशी जनतेची मागणी आहे. वरोरा उपविभागाने पूर्वी आदर्श प्रशासकीय कारभार सादर केला होता. पण आज परिस्थिती उलट आहे. अधिकारी नसल्याने कामांचा वेगच थांबला आहे. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शासनाने यावर तातडीने लक्ष द्यावं, आणि अधिकारी त्वरित रुजू होतील याची खात्री द्यावी. अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

error: Content is protected !!