बल्लारपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपरिषद असलेल्या बल्लारपूर शहर कांग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी माजी नगरपरिषद गट नेते व पत्रकार देवेंद्र उर्फ पाप्पा सत्यदेव आर्य यांची निवड करण्यात आली. ही निवड महाराष्ट्र राज्य कांग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या आदेशान्वये प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्फत जिल्हा कांग्रेसचे अध्यक्ष सुभाष धोटे यांनी केली आहे. यापूर्वी बल्लारपूर शहर कांग्रेसच्या अध्यक्ष पदी अब्दुल करीम कार्यरत होते. त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने देवेंद्र आर्य यांची बल्लारपूर शहर कांग्रेसच्या अध्यक्ष पदावर वर्णी लागली आहे.
. लोकसभा विरोधी पक्ष नेते राहूल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर दरम्यान भारत जोडो पदयात्रा केली होती. त्यावेळी त्यांनी ४ हजार किलोमीटरचे अंतर पादाक्रांत केले होते. काही काळ नवनियुक्त बल्लारपूर शहर कांग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र आर्य यांनी त्या पदयात्रेत कांग्रेस नेते राहूल गांधी यांच्यासोबत सारथ्य केले आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत राहून त्यांनी बल्लारपूर शहरात कांग्रेसच्या जडणघडणीत निष्ठावान कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे. नगरपरिषद मध्ये त्यांनी कांग्रेसचे गट नेते म्हणून देखील त्यांनी कारभार सांभाळले आहे.
. देवेंद्र आर्य यांनी आपल्या निवडीबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधानसभा गट नेते आमदार विजय वड्डेटीवार, कांग्रेस जिल्हा अध्यक्ष व माजी आमदार सुभाष धोटे, खासदार प्रतिभा धानोरकर, जिल्हा प्रभारी आमदार अभिजीत वंजारी, विधानपरिषद आमदार सुधाकर अडबाले, कांग्रेस माजी तालुका अध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, माजी नगराध्यक्ष डॉ.रजनी हजारे यांना श्रेय दिले. त्यांची नियुक्ती झाल्याबद्दल माजी अध्यक्ष अब्दुल करीम, बल्लारपूर तालुका कांग्रेसचे अध्यक्ष गोविंदा उपरे,महिला कांग्रेसच्या तालुका अध्यक्ष अफसाना सय्यद, शहर महिला काँग्रेस अध्यक्ष ॲड. मेघा भाले, माजी नगराध्यक्ष छाया मडावी, दिलीप माकोडे, रजनी मुलचंदानी, डॉ. मधुकर बावणे, डॉ. सुनील कुलदीवार, ॲड.पवन मेश्राम, भास्कर माकोडे, जयकरण बजगोती, इस्माईल ढाकवाला, प्राणेश अमराज, शहरातील कांग्रेस, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवादल, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी आनंद व्यक्त केला.


