Home चंद्रपुर जिल्हा विशेष चक्क प्रेयसी समोरच प्रियकराने घेतला गळफास

चक्क प्रेयसी समोरच प्रियकराने घेतला गळफास

858

गळफासाची गंमत जीवावर बेतली

दोघांत शाब्दिक वाद

प्रेयसीच्याच ओढणीने गळफास

चिमूर येथील घटना

प्रियकराचा जीव वाचवण्यासाठी प्रेयसीचा केविलवाणा प्रयत्न

चिमूर : प्रियकर व प्रेयसी एकांत शोधण्यासाठी चिमूर शहरालगत असलेल्या भूमी इम्पायर ले आऊट मध्ये गेले. तिथे दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीसमोरच तिच्या ओढणीने गळफास घेण्याचे भासविले मात्र ओढणी गळ्याला घट्ट आवळल्या गेल्याने यात त्याचा जागीच मृत्यू झाला. प्रेयसीने त्याचे पाय धरुन वाचण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. ती त्यात अपयशी ठरली. प्रियकराने केलेली गंमत त्याच्या जीवावर बेतली . प्रीतम वाकडे (21) रा. पेंढकेपार ता.उमरेड जी.नागपूर असे मृतक प्रियकराचे नाव आहे. ही घटना मंगळवारी दि. 20 रोजी सायंकाळी 6.30 सुमारास चिमूर – नेरी रोडवरील भूमी एम्पायरच्या ले – आऊट मध्ये घडली.

.      प्राप्त माहितीनुसार चिमूर शहरापासून अठरा किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावातील युवती चिमूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महविद्यालय येथे शिक्षण घेत आहे. तिचा मंगळवार ला पेपर होता. ती तिचा मामेभाऊ असलेल्या प्रियकरासोबत पेपर साठी आली होती. पेपर संपल्यानंतर त्यांनी एकांतात वेळ घालवण्यासाठी नेरी रोड वर असलेल्या भूमी एम्पायर ले आऊट मध्ये गेले. तिथे काही वेळ बसले. आणि दोघात शाब्दिक वाद सुरु झाला. प्रियकराने तिची गंमत करावी म्हणून तिच्या अंगावरील ओढणी घेतली आणि आत्महत्या करतो असे म्हणत ओढणी एका झाडाला बांधली आणि गळफास लावला. मात्र बांधलेल्या ओढणीचा फास गळ्याला घट्ट आवळला गेल्याने प्रेयसी समोरच त्याचा मृत्यू झाला प्रेयसीने त्याला वाचवण्यासाठी जीवापाड प्रयत्न केले पण त्यात ती अपयशी ठरली. त्या नंतर तिने या घटनेची माहिती व घडलेला प्रकार आपल्या नातेवाईकाना फोन करून सांगितला. नातेवाईकानी पोलिसांना संपर्क केला. लगेल पोलीस निरीक्षक संतोष बाकल, सहायक पोलिस निरीक्षक निशांत फुलेकर,उपनिरीक्षक विलास निमगडे, यांनी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. घटनेचा पुढील तपास चिमूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संतोष बाकल यांचे मार्गदर्शनात चिमूर पोलीस करीत आहे.

error: Content is protected !!