वरोरा : आनंद निकेतन महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे सेवानिवृत्त विभागप्रमुख तसेच नुटाचे आजीव सदस्य प्रा. विनायक गं. तराळे यांचे शुक्रवारी दि. १६ मे रोजी दुपारी २.३० च्या सुमारास वयाच्या ७६ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास त्यांचेवर आनंदवनातील स्मृतीवनात अंतिम संस्कार करण्यात आले. याप्रसंगी महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास भाऊ आमटे, डॉ. विजय पोळ, सदाशिव ताजने कविश्वर व विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
. आनंद निकेतन महाविद्यालयाचे विद्यार्थी असलेल्या प्रा. तराळे यांनी प्रदीर्घ काळ याच महाविद्यालयात रसायनशास्त्राचे अभ्यासू व विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून प्रदीर्घ काळ कार्य केले.
. अत्यंत उत्साही, शिस्तबद्ध व सहकार्यशील तसेच आनंदवनातील विविध सेवा कार्याशी निगडित असलेल्या प्रा. तराळे यांचा संस्थापक बाबा आमटे यांचेशी विशेष स्नेह होता. उत्तम संवाद कौशल्य, नीटनेटके हस्ताक्षर, कार्यक्रमाची काटेकोर आखणी व सुक्ष्म नियोजन शैली ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची विशेष ओळख होती.


