Home शैक्षणिक दहावी परीक्षेत फेरीलँड स्कुलचा निकाल 100 टक्के

दहावी परीक्षेत फेरीलँड स्कुलचा निकाल 100 टक्के

1065

भद्रावती : दहावी स्टेट बोर्ड शालांत परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असुन या निकालात शहरातील फेरीलँड शाळेने घवघवीत यश संपादन करीत आपल्या ऊत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.

.       शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असुन सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांना 75 टक्यांपेक्षा जास्त गुण प्राप्त झाले आहे. सदर निकालात शाळेतील मुलींनीच बाजी मारली असुन पहिल्या तिन क्रमांकामधे मुलीच अव्वल आलेल्या आहे. शाळेच्या आरुशी चंद्रकांत निखाडे हिने 91.40 टक्के गुण प्राप्त करीत शाळेत प्रथम, श्रेया श्रीकांत गोंड हिने 88.60 टक्के गुण प्राप्त करीत दुसरी तर शृती भास्कर काकडे हिने 86.80 गुण प्राप्त करीत तृतीय स्थान प्राप्त केले आहे.

.     सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे अध्यक्ष अॅड. युवराज धानोरकर व प्राचार्य वर्षा धानोरकर, प्राचार्य प्रज्ञा ठाकरे यांनी अभिनंदन करुन त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.

error: Content is protected !!