2 लाखाचे नुकसान
हेटी येथील घटना
कोरपना : तालुक्यातील हेटी गावातील जनावरांच्या गोठ्याला अचानक आग लागली. या आगीत जनावरांच्या चाऱ्यांसह शेतीची अवजारे जळाल्याने शेतकऱ्यांचे अंदाजे 2 लाख 50 हजाराचे नुकसान झाले. ही घटना (दि 13) मंगळवारी दुपारी तीन च्या सुमारास घडली.
. हेटी येथील प्रकाश विठ्ठल तुरानकर व प्रमोद विठ्ठल तुरानकर यां दोन्ही भावंडाचे एकमेकाला लागून जनावरांचे गोठे आहे. अचानक लागलेल्या आगीत प्रकाश तुरानकर यांच्या गोठ्यातील शेतीची अवजारे, अनाज , जनावराचा चारा, टिन पत्रे, इतर किरकोळ साहित्य असे एकूण दोन लाख ५५ हजार चे नुकसान झाले.तसेच गोठ्या लगत असलेल्या नागोबा निळकंठ तुराणकर यांच्या घराच्या पाईपलाईन जळाल्यामुळे तीस हजार रुपयाचे नुकसान झाले. प्रमोद विठ्ठल तुरनकार यांचे कुठल्याही साहित्याचे आगीत नुकसान झाले नाही. आगीची माहिती मिळताच कोरपना नगरपंचायत च्या अग्निशमन वाहनाने दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले. सदर घटनेचा पंचनामा ग्राम महसूल अधिकारी शीतल परतेकी व पोलिसांनी केला.


