Home पोलीस डायरी दुचाकी झाडाला आदळली : दुचाकीस्वार जागीच ठार

दुचाकी झाडाला आदळली : दुचाकीस्वार जागीच ठार

810

वरोरा तालुक्यातील घटना

वरोरा

.            बहिणीच्या गावाला जाण्यासाठी दुचाकीने निघालेल्या युवकांचे अचानक दुचाकीवरून नियंत्रण सुटल्याने दुचाकी झाडाला आढळली यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास खांबाळा गावाजवळ घडली. राहुल बंडू क्षीरसागर (२४) रा. शेगाव असे मृतक युवकांचे नाव आहे.
.            वरोरा तालुक्यातील शेगाव (बु) येथील राहुल बंडू क्षीरसागर हा दुपारी १२ वाजताच्या सुमारास दुचाकीने बहिणीच्या गावाला जाण्यासाठी घरून निघाला. दरम्यान खांबाडा गावापासून बारव्हा गावाकडे जात असताना अचानक राहुलचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि रस्त्या लगत असलेल्या झाडावर दुचाकी आदळली. या अपघातात राहुल च्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

.            घटनेची माहिती वरोरा पोलिसाना मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन मोका पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदणासाठी वरोरा येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आला. पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.
.            राहुल हा विवाहित असुन त्याच्या मागे पत्नी, ३ वर्षाचा मुलगा, आई वडील असा बराच मोठा परिवार आहे. राहुल च्या अपघाताची माहिती गावात पोहचताच गावात शोककळा पसरली आहे

error: Content is protected !!