नागभीड : येथे झेप निसर्ग मित्र संस्था, बजरंग दल, पोलीस नागभीड नागभीड च्या संयुक्त विद्यमाने सरस्वती ज्ञान मंदिर नागभीड येथे अमन ब्लड बँक नागपूर च्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले.
. उन्हाळ्याचे दिवस असल्याने रक्ताचा तुटवडा असल्याने गरजू रुग्णांना वेळेत रक्त मिळावा यासाठी सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 25 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सदर शिबिराला माजी आमदार अतुल देशकर, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे, चिमूर विधानसभा प्रमुख गणेश तर्वेकर, भाजपा तालुका अध्यक्ष संतोष रडके, गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्या किरण गजपुरे, स्वामी विवेकानंद पतसंस्था उपाध्यक्ष अजयजी काबरा, भाजपा जिल्हा महामंत्री प्रियाताई लांबट, विजय काबरा, तनय देशकर, डॅनिअल देशमुख, प्रियंका कोरे यांनी भेट देत उपक्रमाचे स्वागत केले..तर रक्तदान शिबीर यशस्वी होण्या साठी अमन ब्लड बँकेचे सुनील सोनवाने यांच्या सह त्यांची टीम, झेप निसर्ग मित्र संस्थेचे अध्यक्ष पवन नागरे, अमित देशमुख, पराग भानारकर, सतिश जिवतोडे, जितू श्यामकुळे, गुलाब राऊत, क्षितिज गरमळे, बजरंग दल नागभीड चे ओमप्रकाश मेश्राम, शुभम सुरपाम व सर्व सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले.


