Home चंद्रपुर जिल्हा विशेष महाराष्ट्र दिनी अवैध रेती तस्करांवर कारवाई

महाराष्ट्र दिनी अवैध रेती तस्करांवर कारवाई

899

वरोरा : तालुक्यातील शेगांव, चारगाख खुर्द, चारगाव बु. दौऱ्यावर असलेल्या महसूल विभागाच्या भरारी पथकाने मौजा  शेगांव बु. गावच्या परिसरात अवैध रित्या रेतीची वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर वर कारवाई करून शेगाव पोलीस ठाण्यात जप्तीची कारवाई करण्यात आली. ही कारवाई 1 मे महाराष्ट्र दिनी सकाळी 9:30 वाजताचे सुमारास करण्यात आली.

.       सर्वत्र महाराष्ट्र दिन, कामगार दिवस साजरा होत असतांनाही रेती तस्कर मात्र रेतीची तस्करी करण्यात मग्न झाले आहे. या रेती तस्करावर कारवाई करण्यासाठी वरोरा चे तहसीलदार यांच्या मार्गदर्शनात भरारी पथकाची निवड करण्यात आली असून या पथकाच्या माध्यमातून दररोज रेती तस्करांवर कारवाई होताना दिसत आहे. दि 1 मे रोजी अवैध उत्खनन तपासणी करीता ग्राम महसूल अधिकारी, शेगांव, चारगाख खुर्द, चारगाव बु. दौऱ्यावर असतांना सकाळी 9:30 वाजताचे सुमारास मौजा – शेगांव बु. गावच्या परिसरात टॅक्ट्रर वाहन क्रमांक – MH-31-AP-2444 हे वाहन महसूल पथकाव्दारे जप्त करण्यात आले असून, पोलीस स्टेशन, शेगांव येथे जमा करण्यात येऊन सदर वाहनाचा जप्तीनामा / पंचनामा करण्यात आला. सदर कारवाई पोलीस व महसूल विभाग यांनी सहकार्याने पूर्ण करून वाहन सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस स्टेशन शेगाव येथे जमा करण्यात आले.वाहनावर जमीन महसूल अधिनियम अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

ट्रॅक्टर पळाला                                                                                                                                                                                       मौजा अर्जुनी येथे अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर अर्जुनी येथील तलाठ्याने पकडला. त्या ट्रॅक्टर मध्ये विना परवाना एक ब्रास रेती असल्याचे तलाठ्याच्या लक्षात आले. तलाठी उभा असतानाच पकडण्यात आलेले ट्रॅक्टर पळून गेल्यामुळे तलाठी यांचेद्वारे सदर वाहन मालक व वाहनावर शेगाव पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: Content is protected !!