Home विशेष खते बी-बियाणे कीटकनाशके कायदा करण्यास महाराष्ट्रातील त्रिमूर्ती सरकार नापास – वसंत मुंडे

खते बी-बियाणे कीटकनाशके कायदा करण्यास महाराष्ट्रातील त्रिमूर्ती सरकार नापास – वसंत मुंडे

909

परळी :  बोगस खते बी-बियाणे, कीटकनाशके, औषधी कृषी निष्ठा उत्पादक व विक्रेते दुकानदारामार्फत शेतकऱ्यांना विक्री करून आर्थिक व्यवहाराचे लागे बंद असलेले सोनेरी टोळक्याने धुमाकूळ घातलेला असुन खाजगी कंपनीच्या दबावापोटी खते बियाने कीटकनाशके कायदा करण्यास महाराष्ट्रातील त्रिमूर्ती सरकार अकार्यक्षम असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केला.

.      तिन्ही माझी कृषिमंत्र्यांनी व कृषी खात्याच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी अनेक योजनेमध्ये टक्केवारीचा गोंधळ घातल्यामुळे शेतकऱ्याला सर्व सवलतीचा लाभ वेळेनुसार मिळत नाहीत. खरीप पेरणीच्या अगोदरच मध्यप्रदेश, गुजरात मधून बोगस बियाणे महाराष्ट्रात येण्यास सुरुवात झालेली आहे. तरीही कृषी मंत्री कार्यालयाकडून कारवाईच्या आदेश देण्यात आलेले नाहीत. बोगस खते बियाणे कीटकनाशके ना आळा घालण्यासाठी नवीन कृषी कायदा करताना शेतकऱ्याच्या आर्थिक नुकसान देण्यास नियमानुसार प्राधान्याने कायद्यात तरतूद करून शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी शासनाकडे केली आहे.

error: Content is protected !!