तहसीलदारा मार्फत पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना निवेदन
वरोरा : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या भ्याड हल्ल्यात २८ निष्पाप पर्यटकांचा बळी गेला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. या पार्श्वभूमीवर वरोरा शहरातील मुस्लिम बांधवानी काळ्या फित लावून निषेध करत दहशतवाद विरुद्ध कठोर पावले उचलण्याची मागणी एका निवेदनातून केली.
. तहसीलदार वरोरा यांच्या मार्फत पाठविण्यात आलेल्या निवेदनातुन काही मागण्या केल्या गेल्या आहे त्या याप्रमाणे आहे की, या हल्ल्याची सखोल चौकशी करून मुख्य सूत्रधार आणि संबंधित दहशतवाद्यांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी. जम्मू-कश्मीरमध्ये आणि देशभरात दहशतवाद्यांच्या हालचाली आणि डिजिटल टेक्नॉलॉजी विशेष तपासणी करून ती मुस्कटात नष्ट करण्यात यावी.
. देशाच्या सीमांवरील भागात आणि संवेदनशील ठिकाणी गुप्तचर यंत्रणा अधिक सक्षम व आधुनिक उपकरणांनी सज्ज करण्यात याव्यात. नागरिकांच्या सुरक्षेसाठी केंद्र व राज्यसरकार पालकत्व समन्वय धोरण राबवून, तात्काळ कृती आराखडा तयार करावा. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या विचारधारेवर सामाजिक आणि व्यापारी पातळीवर बंदोबस्त करण्यासाठी जनजागृती व शिक्षण मोहिमा राबवण्यात याव्यात. यावेळी निवेदन सादर करताना हाताला काड्या पट्ट्या बांधून मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव हल्ल्याचे निषेध करून कारवाईची मागणी करण्यात आली.


