Home चंद्रपुर जिल्हा विशेष जंगल सफारी साठी निघालेल्या पर्यटकाच्या कारची जंगली डुकराला धडक

जंगल सफारी साठी निघालेल्या पर्यटकाच्या कारची जंगली डुकराला धडक

960

गोंडमोहाळी फाट्यावरील घटना

चार पर्यटक जखमी

जंगली डुक्कर जागीच ठार

नेरी : ताडोबा जंगल सफारी करण्यासाठी निघालेल्या पर्यटकांच्या कार समोर अचानक जंगली डुक्कर आला. त्याला वाचविण्याच्या नादात चालकांचे कार वरील नियंत्रण सुटले आणि कार पळसाच्या झाडाला जाउन धडकली. यात कार मधील चार पर्यटक जखमी झाल्याची घटना ताडोबा बफर झोन क्षेत्रातील गोंडमोहाळी फाट्याजवळ शनिवारी दिनांक १९ एप्रिल ला सकाळी ६ वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेत रानडुकराचा जागीच मृत्यू झाला.

.      प्राप्त माहितीनुसार ताडोबा बफर झोन क्षेत्रातील गोंडमोहाळी फाट्याजवळ ताडोबा व्याघ्र प्रकल्पात आज शनिवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शिरसाळा प्रवेशद्वारावरून सफारी करण्याकरता मुंबई येथून योगेश कमलिया (33), दीक्षा जया शेट्टी (34) धीरज हेगडे (32) नमिता छाभरा (34) रा. मुबंई हे चार पर्यटक शुक्रवारी आले होते. शनिवारी सकाळी ते एका खासगी रिसॉर्टवरून स्वतःचे एम एच 48 ए टी 0566 या चारचाकी वाहनाने बफर झोनमधील शिरकाळा प्रवेशद्वारावर जंगल सफारीकरीता निघाले होते. दरम्यान गोंडमोहाडी फाट्याजवळ पर्यटकाच्या वाहनासमोर अचानक रानडुक्कराने वाहनाला जोरदार धडक दिली, यामुळे वाहन चालकाचे कार वरील नियंत्रण सुटले आणि पळसाच्या झाडाला धडकले. यात वाहनातील चौघे जण जखमी झाले. एकाच्या हाताला गंभीर दुखापत झालेली आहे. या जखमीना उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे भरती करण्यात आले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्या जातं आहे.

.         धडक एवढी जोरदार होती की त्या धडकेत जंगली डुकर जागीच ठार झाला. वनविभागाने वन्यजीव अधिनियम (Wildlife Act) नुसार गुन्हा नोंदवला आहे.

error: Content is protected !!