मशाल दिंडी काढून पोकरा प्रकल्पाची जनजागृती
चंद्रपूर : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) या योजनेच्या अंमलबजावणीसाठी भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथे मशाल दिंडी काढत पोकरा प्रकल्पची जनजागृती करण्यात आली. या पोकरा प्रकल्पा अंतर्गत भद्रावती तालुक्यातील नंदोरी गावाची निवड करण्यात आली असून हा कार्यक्रम पाच दिवस राबविल्या जाणार आहे. मशाल फेरी हा या कार्यक्रमाचा पहिला दिवस होता.
. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) दुसरा टप्पा राबविण्यात येत आहे. यात भद्रावती तालुक्यात निवड झालेल्या 31 ग्रामपंचायतीं मध्ये 51 गावांचा समावेश आहे. या गावात ग्राम कृषी विकास समिती स्थापन करण्यात आली आहेत.
. या प्रकल्पाचा पहिला कार्यक्रम भद्रावती तालुक्यातील नंदोरी गावात घेण्यात आला. मंगळवारी सायंकाळी 7 वाजता ग्रामपंचायत कार्यालया पासून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा -२ अंतर्गत* लोकसहभागीय सुक्ष्म नियोजन या पथदर्शी कार्यक्रमाची सुरुवात मशाल फेरी काढून करण्यात आली. गावातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करत दिंडी लहान हनुमान देवस्थान येथे पोहचली यावेळी गाव बैठक घेऊन गावकऱ्यांना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प विषयी ओळख करून प्राथमिक माहिती प्रकल्प समन्वयक संदीप पाटील यांनी दिली.
. लोकसहभागातून सुक्ष्म नियोजनाद्वारे राबवावयाच्या विविध उपक्रमाविषयी माहिती मंडळ कृषि अधिकारी ए. व्हि. भरडे भद्रावती यांनी दिली. तसेच सरपंच श्रीहरी भोयर, शेतकरी उत्पादक कंपनीचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र जिवतोडे, कृषी पर्यवेक्षक एच. एल. इद्दे व कृषी सहाय्यक आर. एस. डोळस यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तलाठी रवींद्र लोंढे, ग्रामपंचायत उपसरपंच उषा लांबट, सदस्य किशोर उमरे, शरद खामणकर, स्वप्नील लांबट, ग्राम कृषी विकास समितीचे सदस्य, स्वयंसेवक, ग्रामपंचायत सदस्य, बचतगट महिला, गावातील शेतकरी,महिला शेतकरी मोठया प्रमाणात उपस्थित होते.
…अशी असले ग्राम कृषी विकास समिती पदसिद्ध अध्यक्ष – सरपंच, पदसिद्ध सदस्य – उपसरपंच, सदस्य – ग्रामपंचायत सदस्य (एक), प्रगतिशील शेतकरी – तीन (यात एक महिला), विविध कार्यकारी सहकारी संस्था – एक सदस्य, शेतकरी उत्पादक कंपनी/गट – एक सदस्य, महिला बचत गट एक सदस्य, कृषी पूरक व्यावसायिक शेतकरी – दोन, यासह ग्रामसेवक, कृषी सहायक व तलाठी अशा १४ सदस्यांचा समावेश असणार आहे.


