जामणी सेवा सह संस्थेला अडीच कोटीचे कर्ज वाटप
वरोरा : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा टेमुर्डा ने सन 2025 -26 या हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करीत जिल्ह्यातून प्रथम पिक कर्ज वाटपाचा मान पटकावीला.
. चंदपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्यांच्या हिताची बँक म्हणून ओळखली जाते म्हणूनच जिल्हा बँकेला शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची बैंक असे म्हटले जाते. 2025 – 26 या हंगामासाठी चंदपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा टेमुर्डा ने सन 2025-26 चे हंगामासाठी पिक कर्ज वाटप केले आहे. शाखा टेमुर्डा अंतर्गत जामणी सेवा सहकारी संस्था र.न. 1638 च्या 180 सभासदांना 2 कोटी 51 लाख रुपयाचे पिक कर्ज वाटप दि. 16/04/2025 ला करण्यात आला.
. याप्रसंगी विभागीय अधिकारी राजु पिंपापुरे, जामणी सेवा सह संस्थेचे अध्यक्ष पुष्पाकर पाटील खेवले, संस्थेचे व्यवस्थापक अमित हिवरकर, शाखा व्यवस्थापक कोहीनूर भोयर, शाखा निरीक्षक दिपक चिडे इतर कर्मचारी व शेतकरी सभासद उपस्थित होते.


