Home चंद्रपुर जिल्हा विशेष वनविभागाच्या भांडारगृहाला आग

वनविभागाच्या भांडारगृहाला आग

966

वनमजुराच्या सतर्कतेने आग आटोक्यात

किरकोळ स्वरूपाचे नुकसान

भद्रावती : भद्रावती वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या भंडारगृहाला आग लागली. मात्र ही आग वेळीच वनमजुरांच्या लक्षात येताच वनमजुरांनी आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या आगीत काही प्रमाणात साहित्य जळाल्याची माहिती आहे. सदर घटना दि. 12 रोज शनिवारला सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली. सदर आग ही शार्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज आहे.

.      शनिवारी सकाळी काही वनमजूर वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या भांडारगृहाकडे कामानिमित्त गेले होते. त्यांना भंडारगृहातून धूर निघत असल्याचे लक्षात आले. वनमजुरांनी भंडारगृहाकडे धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. व वरिष्ठ अधिकार्‍यांना माहिती दिली. अधिकार्‍यांनी घटनेची माहिती नगर परिषदेच्या अग्निशामन विभागाला दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी लगेच अग्निशामन वाहन पाठवून आग पूर्णतः विझवली. या आगीत भंडारगृहातील काही साहित्य जळाल्याची माहिती आहे. आग लागल्याचे वेळीच वनमजुरांच्या लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला. वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांनी घटनास्थळी पोहचत भंडारगृहाची पाहणी केली.

error: Content is protected !!