नागरिकांची मागणी
कामचुकार कर्मचाऱ्यांना बसणार आळा
चिमूर : जिल्हयात जवळपास ५८ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या आरोग्य कर्मचाऱ्यावर वॉच ठेवण्यासाठी म्हणून बायोमेट्रीक प्रणालीद्वारे हजेरी लावून या नुसारच कर्मचाऱ्यांचे मस्टर काढण्यात यावेत अशी नागरिकांकडून मागणी केली जात आहे. त्यामुळं आरोग्य केंद्रातील कामचुकार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आळा बसणार आहे.
. चिमूर तालुक्यात भिसी, जांभूळघाट, नेरी, मासळ, खडसंगी, शंकरपूर असे एकूण सहा प्राथमिक आरोग्य केंद्र असून, जवळपास ३६ ते ३८ उपकेंद्रे आहेत. यातील काही मोजक्याच उपकेंद्रात आरोग्य कर्मचारी वास्तव्याने राहतात तर अनेक उपकेंद्रात आरोग्य कर्मचारी वास्तव्याने राहतच नसून नागपुर, वरोरा, येथून जाणेयेणे करीत असतात त्यातही काही आरोग्य कर्मचारी फक्त लसीकरण करण्यापुरतेच उपकेंद्राला येत असतात. तर काही आरोग्य कर्मचारी पंधरा पंधरा दिवस ड्युटी करुन पंधरा दिवस कोणतेही काम न करता विना अर्जाने गौरहजार असतात, पगार मात्र पुर्ण महिण्याचे काढले जातात. अश्या हजेरी पत्रकावर वैद्यकिय अधिकारी डोळे झाकून सह्या करीत असतात. हा सर्व खेळ वैद्यकिय अधिकारी आखो देखा हाल पहात असून, वैद्यकिय अधिकारी सुद्धा आठवड्यातून तिन दिवस ड्युटी करीत असतात. या सर्व बाबीकडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांचे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. जेव्हा तालुका अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देतात तेव्हा मात्र बरोबर उपस्थित राहतात. असे प्रकार चिमूर तालुक्यांतील प्राथमिक आरोग्य केंद्रात सूरु आहे. काही आरोग्य कर्मचारी तर आपल्या कामावरील कर्तव्यावर जात नसून, प्राथमिक आरोग्य केंद्रातच तळ ठोकून मुक्कामी असल्याचे सुद्धा प्रकार सूरु आहे. या सर्व बाबीकडे तालुका आरोग्य अधिकारी यांचे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे.
. या सर्व बाबी समोर येवू नयेत म्हणून काही आरोग्य कर्मचारी यांचेकडून वैद्यकिय अधिकारी यांना निवेदन देवुन बायोमेट्रीक प्रणालीद्वारे हजेरी लावण्याचे सक्ती करु नये. असे कामचुकार करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून निवेदन दिले आहे. अशी माहीती आहे. त्यामुळं तालुक्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात व उपकेंद्रात बायोमेट्रीक प्रणालीद्वारेच आरोग्य कर्मचाऱ्यांचे हजेरी पत्रक काढण्यात यावेत अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


