Home चंद्रपुर जिल्हा विशेष पाण्याच्या टाकीवरून खाली पडल्याने सफाई कामगारांचा मृत्यू

पाण्याच्या टाकीवरून खाली पडल्याने सफाई कामगारांचा मृत्यू

982

खाली उतरताना मधमाश्यानी केला हल्ला

मिंनझरी येथील घटना

चिमूर : नळ योजनेची पाण्याची टाकी साफ करून खाली उतरत असताना अचानक मधमाश्यानी हल्ला केल्याने पायऱ्यांवरून पाय घसरून खाली पडल्याने सफाई कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. सुधाकर पेंदाम (३५)रा मुरपार असे मृतक सफाई कामगारांचे नाव आहे.

.     प्राप्त माहितीनुसार चिमूर तालुक्यातील मिनझरी गावातील नळ योजनेची पाण्याची टाकी साफ करण्यासाठी मुरपार येथील रहिवासी सुधाकर पेंदाम हे टाकीवर चढले. टाकी साफ करून झाल्या नंतर खाली उतरत असताना मधमाशांनी अचानक हल्ला केला. सुधाकर पायऱ्यांवरून खाली उतरत असताना पाय घसरल्याने टाकीवरून खाली पडला यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

.      सदर घटनेचा पंचनामा चिमूर पोलिसांनी केला, मृतदेहाची उत्तरीय तपासणी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे करण्यात आली असून चिमूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष बाकल यांचे मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम नवखरे पुढील तपास करीत आहेत.

error: Content is protected !!