Home चंद्रपुर जिल्हा विशेष गडचांदूरात एक मृत तर एक युवक बेशुद्ध अवस्थेत आढळले

गडचांदूरात एक मृत तर एक युवक बेशुद्ध अवस्थेत आढळले

984

गडचांदूर : येथील सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या मागे दिनांक 10 एप्रिल गुरुवार एक युवक मृत अवस्थेत तर एक युवक बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने शहरात खडबड उडाली आहे. प्रज्वल नवले (21), वार्ड नंबर 3 गडचांदूर असे मृतकाचे नाव आहे तर नागेश लांडगे (20 ) वार्ड नंबर 6 गडचांदूर असे बेशुद्ध अवस्थेत असलेल्या युवकांचे नाव आहे.

.   प्राप्त माहितीनुसार नागेश व प्रज्वल हे दोघेही मित्र होते. दोघांनीही विषप्राशन केल्याचे प्रथमदर्शनी च्या निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून बेशुद्ध असलेल्या नागेशला तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तर प्रज्वल चा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. चित्र अस्पष्ट असले तरी प्रेम प्रकरणातून सदर घटना घडल्याची चर्चा सध्या ऐकायला मिळत आहे. बेशुद्ध असलेल्या मित्राला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले असून तो शुद्धीवर आल्यानंतर आणि शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच सत्य काय ते समोर येईल. मात्र ही हत्या की आत्महत्या? शंकाकुशंकांना पेव फुटले असून सदर प्रकरणी पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

error: Content is protected !!