चिमूर : तालुक्यात येत असलेल्या केवाडा पेठ येथे विनयभंग तथा मारहाण प्रकरणी दोन आरोपीना तीन वर्षे सक्षम कारावासाची शिक्षा दिवाणी व फौजदारी न्यायालय, चिमूर ने ठोठावली यातील आरोपी धोंडु श्रावण चौधरी, वय-५० वर्षे राहणार केवाडा (पेठ) आरोपी सचिन केवाजी मोहुरले, वय-२२ वर्षे राहणार केवाडा (पेठ) तालुका चिमुर जिल्हा चंद्रपूर यांच्या विरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३५४ (ब), ५०६, ३४ अन्वये चिमुर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा नोंद झालेला होता. व गुन्ह्यातील सखोल तपासानंतर सहायक पोलीस निरीक्षक सुनिल झुरमुरे पोलीस स्टेशन चिमुर यांनी प्रथमवर्ग न्यायवंडाधिकारी न्यायालय, चिमुर येथे आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले.
. सदर प्रकरण न्यायालयात सरकार पक्षातर्फे फिर्यादी व इतर साक्षदाराचे साक्षपुरावे घेण्यात आले.फिर्यादी व इतर साक्ष पुराव्याच्या आधारे श्रीमती आर. व्ही. डफरे, न्यायदंडाधिकारी प्रथमश्रेणी, चिमुर यांनी दिनांक. २८/०३/२०२५ रोजी आरोपी धोंडु भ्रावण चौधरी, व आरोपी सचिन केवाजी मोहुर्ले, यांना सदर प्रकरणात कलम ३५४(ब) भारतीय दंड विधान अन्वये दोषी ठरवुन आरोपींना प्रत्येकी ३ वर्षाची सश्रम कारावास व प्रत्येकी १०००/- रू. दंड इतकी शिक्षा ठोठावली सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे के.व्ही. तोकलवार, सहाय्यक सरकारी अभियोक्ता, चिमुर यांनी बाजु मांडली व पोलीस निरीक्षक संतोष बाकल, पोलीस स्टेशन चिमुर यांच्या मर्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी म्हणुन बलदेव कुमरे, पोलीस हवालदार, पोलीस स्टेशन चिमुर यांनी काम पाहीले.


