नेरी
. नेरीवरून जवळ असलेल्या मोटेगाव येथील लोक विद्यालयाचे मुख्याध्याक अनिल सुकारे हे सेवानिवृत्त झाले त्यांनी दिलेली सेवा आणि केलेल्या उत्कृष्ट कार्यबदल त्यांचा 30 सप्टेंबर ला लोक विद्यालयाच्या वतीने सपत्नीक सत्कार करून निरोप देण्यात आले.
. मोटेगाव येथील लोक विद्यालयात अनेक वर्षे सेवा दिली. आपल्या उत्कृष्ठ कार्यातून त्यांनी शाळेची व विद्यार्थ्यांची प्रगती साधली. अनेक मुलांना शालेय प्रवाहात आणून त्यांचे भविष्य बनविले. अश्या त्यांच्या महान कार्याचा गौरव करण्यासाठी विद्यालयाच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करून निरोप देण्यात आले यावेळी भेटवस्तू, शाल श्रीफळ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.
. यावेळी शालेय शिक्षकांनी तसेच ग्रा प सरपंच शालेय संचालक पदाधिकार्यांनी त्यांच्या सेवेतील व कार्याच्या आठवणीला उजाळा दिला या कार्यक्रमाला ऋषिदेव पिसे महासचिव युगप्रवर्तक सेवा मंडळ नेरी, अतिथी म्हणून माधव मेंदुलकर, एन टी पिसे, वाघमारे, सरपंच सुभाष नेवारे, विलास कोराम, माजी सभापती देवराव दुधे, गणेश पा सुकारे, दिवाकर दडमल, सुधाकर बावणे उपस्थित होते.
. या कार्यक्रमाचे संचालन प्रवीण ढोले यांनी केले तर प्रास्ताविक नैना सुकारे यांनी केले आणि आभार मोरेश्वर वासेकर यांनी मानले.


