Home विदर्भ सोयाबीन उत्पादक शेतकर्यां ना हेक्टरी १ लाख रुपये अनुदान द्या

सोयाबीन उत्पादक शेतकर्यां ना हेक्टरी १ लाख रुपये अनुदान द्या

825

किशोर टोंगे यांचे 3 ऑक्टोबर ला उपविभागीय कार्यालयावर धरणे आंदोलन व लाक्षणिक उपोषण

वरोरा

.           शेतकर्‍यांच्या हातात आलेले सोयाबीन पीक पाहता पाहता पिवळे पडून करपले. यामुळे शेतकर्यां ची दिवाळी अंधारात जाणार आहे. मात्र या परिस्थितीत शासन स्तरावरून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदतीच्या संदर्भात कुठल्याही हालचाली दिसत नसल्याने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी किशोर टोंगे हे 3 ऑक्टोबर ला उपविभागीय कार्यालयावर धरणे आंदोलन व लाक्षणिक उपोषण करणार असल्याने वरोरा भद्रावती तालुक्यातील शेतकर्यांानी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

.           सोयाबीन पिकाला नगदी पीक म्हणून ओळखल्या जाते. त्यामुळे वरोरा भद्रावती तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी सोयाबीन ची लागवड करतात. यावर्षी पाऊस उशिरा आल्याने शेतकर्यां नी सोयाबीन ची लागवड उशिरा केली. मात्र सोयाबीन ला पोषक असा पाऊस आल्याने यावर्षी सोयाबीन चे भरघोष पीक होणार अशी आशा असताना अचानक सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला आणि अख्खे पिकच करपू लागले. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. मात्र या परिस्थितीत शासन स्तरावरून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदतीच्या संदर्भात कुठल्याही हालचाली दिसत नसल्याने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी किशोर टोंगे मैदानात उतरत असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाने तात्काळ शेतात जाऊन पंचनामे करून सोयाबीन पिकासाठी कोणतेही निकष न लावता सरसकट हेक्टरी १ लाख रुपये अनुदान देण्यात यावे जेणेकरून शेतकर्‍यांची दिवाळी अंधारात जाणार नाही.

.           सोयाबीन पिकाच्या नुकसानीमुळे शेतकरी अस्वस्थ असून काही ठिकाणी आत्महत्या झाल्या असल्याचे नमूद करून ते म्हणाले की मी या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार आणि कृषी मंत्री यांना निवेदन सादर केले मात्र पश्चिम महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी तातडीने बैठका घेऊन अनुदान देणार सरकार आमच्या सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी कुठल्याही बाबतीत संवेदनशील दिसत नाही त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांसह लक्षणिक उपोषण व धरणे आंदोलन करीत आहोत अशी माहिती त्यांनी दिली. सोयाबीन शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर असून शासनाचे लक्ष वेधून घेण्याच्या दृष्टीने हे आंदोलन करण्यात येणार असून सर्वपक्षीय नेत्यांनी देखील सहभागी व्हावे व शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

error: Content is protected !!