Home चंद्रपुर जिल्हा विशेष परसोडा येथील मेंढपाळ्याच्या बकऱ्या गोठ्यातुण गेल्या चोरी

परसोडा येथील मेंढपाळ्याच्या बकऱ्या गोठ्यातुण गेल्या चोरी

1057

तालुक्यात बकऱ्या चोरी करणारी टोळी सक्रिय

वरोरा : तालुक्यातील अंबादास चामाटे हे जगण्यासाठी उदरनिर्वाह म्हणून बकऱ्यांच्या व्यवसाय करतात. त्यांच्या कडे जवळपास चाळीस बकऱ्या गोठ्यात होत्या. दररोज प्रमाणे दिवसभर बकऱ्या चारून सायंकाळी सहा वाजता गोठ्यात बांधल्या. आणि रात्री पहारेकरी म्हणून स्वतः गोठ्या जवळ झोपायला गेले. सकाळी पहाटे झाली. चार वाजता गोठ्यातून घराकडे गेले व सहा वाजता गोठा साफ करण्यासाठी परत आले. परंतु संपूर्ण बकऱ्या गोठ्या बाहेर काढल्या नंतर असे लक्षात आले की आपल्या बकऱ्या गायब झाले असे निर्दशनात आले.

.      त्यावेळी अंबादास चामाटे यांच्या आपल्या बकऱ्या चोरी तर नसेल झाल्या म्हणून गावकर्यांना गोळा केले. तब्बल पन्नास हजारचा माल चोरीला गेला या गोष्टीच खुप दुःख झाले. त्यांनी मदत म्हणून पोलीस स्टेशन वरोरा येथे धाव घेउन लेखी तक्रार दिली. पुढील तपास वरोरा पोलीस करत आहे. परंतु चोरीची ही घटना वरोरा तालुक्यात ग्रामीण भागात खुप प्रमाणात वाढली असून काही दिवसापूर्वी मांगली, टेमुर्डा इथून बकऱ्या चोरी झाल्याची चर्चा आहे. तालुक्यात जनावरे चोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. यात शेतकरी व मेंढपाळ नागरिकांचे खुप नुकसान होत आहे. तरी पोलीस विभागाने सखोल चौकशी करून जनावरे चोरी करणाऱ्या टोळीला लवकरात लवकर पकडावी अशी तालुक्यातील शेतकर्‍यांची व मेंढपाळ्यांची पोलीस प्रशासनाला मागणी होत आहे.

error: Content is protected !!