Home चंद्रपुर जिल्हा विशेष बुध्दगया महाबोधी महाविहार मुक्तिसाठी वरोर्‍यात 2 एप्रिल ला भव्य शांती मार्च

बुध्दगया महाबोधी महाविहार मुक्तिसाठी वरोर्‍यात 2 एप्रिल ला भव्य शांती मार्च

1026

वरोरा : बुध्दगया येथिल महाबोधी महाविहार बौध्दांच्या ताब्यात देण्यासाठी देशभरात आंदोलन सुरु आहे. या अंतर्गत येत्या 2 एप्रिल ला वरोरा येथे सकाळी 11.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते तहसील कार्यालया पर्यंत भव्य शांती मार्च काढला जाणार आहे. भन्ते महाथेरो ज्ञानज्योती, डॉ. चेत्ती भन्तेजी आणि भिक्कू संघ, संघरामगिरी पुज्य भदन्त धम्मासारथी आणि भिक्कू संघ, बुध्दीष्ठ सेमिनारी उंटखाना, नागपूर यांचे नेतृत्वात भव्य शांती मोर्चा काढण्यात येणार आहे.

.     अखिल विश्वाच्या बौध्दांचे श्रध्दास्थान असलेले बुध्दगया येथील महाबोधी महाविहार विश्वात प्रसिध्द आहे. तथागत भगवान बुध्दाला याच ठिकाणी बुध्दत्य प्राप्त झाले. ज्या बोधीवृक्षाखाली बसून भगवान बुध्दाने ज्ञान प्राप्त केले तो पवित्र बोधीवृक्ष आजही या ठिकाणी अस्थित्वात आहे. या जागेचे महत्य व पावित्र्य लक्षात घेऊन सम्राट अशोकाने या ठिकाणी भव्य महाविहाराची निर्मिती केली. कालांतराने प्रतिक्रांतीच्या विळख्यात महाबोधी महाविहाराची दुरावस्था झाली व पुढे अनेक वर्ष हा महाविहार विलुप्त अवस्थेत होता. श्रीलंकेत जन्मलेले महान बौध्द तत्वज्ञानी अनागारीक धम्मपाल यांच्या अथक परिश्रमाने बुध्दगयेच्या महाबोधी विहाराचे पुनश्च संवर्धन करण्यात आले. तेव्हापासून या महाबोधी महाविहाराला भेट देण्यासाठी व तथागत भगवान बुब्दांना अभिवादन करण्यासाठी संपुर्ण विश्वातून बौध्द अनुयायी बुध्दगया येथे येतात. या ठिकाणी विश्वातील बौध्द राष्ट्रांनी बौध्दगया येथे आपआपल्या विहारांची निर्मिती केली आहे. आणि त्यामुळे बिहार राज्यांना फार मोठे महत्व प्राप्त झाले आहे.  बिहार विधानसभेने १९४९ साली बुध्दगया टेम्पल अॅक्ट १९४९ ची निर्मिती केली. त्यावेळेस या कायदयानुसार नऊ लोकांची त्या विहाराची देखरेख करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळेस भारतामध्ये बौध्दांची संख्या कमी असल्यामुळे हे नऊही लोक हे हिंदु धर्मियच असायचे. परंतू १४ ऑक्टोंबर १९५६ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या दिक्षाभुमीवर लाखो लोकांना बुध्दधम्माची दिक्षा दिल्यामुळे आज महाराष्ट्रात बौध्दांची संख्या साधारणतः एक कोटी आहे. तसेच १९५६ नंतर अनेक प्रांतांमध्ये बौध्द धम्म विक्षेची लाट आल्यामुळे आज भारतात बौध्दांची संख्या कित्येक कोटींनी वाढलेली आहे.

.       बुध्दगया महाबोधी महाविहार मुक्तिसाठी भन्ते महाथेरो ज्ञानज्योती, डॉ. चेत्ती भन्तेजी आणि भिक्कू संघ, संघरामगिरी पुज्य भदन्त धम्मासारथी आणि भिक्कू संघ, बुध्दीष्ठ सेमिनारी उंटखाना, नागपूर यांच्या नेतृत्वात बुध्दगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समन्वय समिती, वरोरा च्या वतीने तहसिलदार वरोरा यांना निवेदन देण्यात येणार आहे. या आंदोलनाकरीता सर्वांनी पांढरे शुभ्र वस्त्र घालून हजारोंच्या संख्येंनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

error: Content is protected !!