Home चंद्रपुर जिल्हा विशेष ट्रॅव्हल्स हायवा ट्रकची समोरासमोर धडक

ट्रॅव्हल्स हायवा ट्रकची समोरासमोर धडक

1032

एक गंभीर : १५ जखमी

ब्रह्मपुरी नागभीड मार्गावरील घटना

ब्रह्मपुरी : नागपूर वरून प्रवासी घेऊन ब्रह्मपुरी कडे भरधाव वेगाने येत असलेल्या खासगी ट्रॅव्हल्सने ब्रम्हपुरी वरून नागपूरला जाणाऱ्या हायवा ट्रकला समोरासमोर जबर धडक दिली. या भीषण अपघातात एक गंभीर जखमी तर पंधरा प्रवासी जखमी झाल्याची घटना गुरवारी दुपारी २.१५ च्या दरम्यान नागभिड ब्रम्हपुरी मार्गावरील सायगाटा फाट्यावर घडली.

.      सविस्तर वृत्त की, श्री ताज ट्रॅव्हल ही नागपुर येथून प्रवासी घेऊन वडसा येथे भरधाव वेगात जात होती. दरम्यान ब्रम्हपुरी नागपुर मार्गावर ट्रॅव्हल चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले. आणि समोरुन येत असलेल्या एका हायवा ट्रकला धडकली. या गंभीर अपघातात दोन्ही वाहनांचा समोरील भागाचा चुरा झाला. तर ट्रॅव्हल मधील १५ प्रवासी जखमी झाले. असून जखमी मध्ये अजमेर पठाण (22) रा. नागभीड, सुनंदा लोखंडे (29) कुही, दीपिका मते (27) रा. वडसा, चंद्रकला धोटे (७०) नागपूर, कमलाबाई इंदुरकर (78) नागपूर, पवन कराडे (32) चिमूर, मुस्कान पठाण (25) नागभीड, निशांत मेश्राम (39) मुल, कुणाल मडावी (16) नागभीड, जितेंद्र गेडाम (26) कुनघाडा, सचिन धोटे (32) नागपूर, गुड्डू धोंगडे (37) नागपुर, एकनाथ गजभिये (40) चिमूर, छत्रीगसिंग बावणे (45) वडसा या प्रवाशांचा समावेश आहे. तर ट्रॅव्हल कंडक्टर जितेंद्र गेडाम हा गंभीर जखमी झाला आहे. जखमींना ब्रम्हपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुचाकी व एका कारला ओव्हर टेक करण्याच्या नादात ट्रॅव्हल टिप्पर ला जाऊन धडकून भिषण अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

.       यावेळी उपस्थित पत्रकार नंदु गुडडेवार यांना घटनेची माहिती मिळताच स्वतःची चार चाकी वाहन घेऊन घटना स्थळी जावून जखमींना गाडीत टाकून रुग्णालयात दाखल केले.

error: Content is protected !!