Home चंद्रपुर जिल्हा विशेष चंद्रपूर समाजकल्याण विभागात आज होणार जनसुनावणी

चंद्रपूर समाजकल्याण विभागात आज होणार जनसुनावणी

1020

वसतिगृहातील विद्यार्थ्याला अमानुष मारहाण प्रकरण

चिमूर : तालुक्यातील बोथली (वहानगाव) वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्याला सोबतच राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी जबर मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. यात मारहाण ही अनेक विद्यार्थ्यांनी मिळून केली आहे पण एवढा मोठा प्रकार घडत पर्यंत याकडे व्यवस्थापनाच दुर्लक्ष ही अक्षम्य चूक झाली यात आता कुणावर कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष आता समाजकल्याण विभागाकडे लागले आहे. यासाठी आज समाजकल्याण विभागात जनसुनावणी ठेवण्यात आली असल्याचे त्यानूसार पुढील कारवाई केली जाणार असेही समाजकल्याण विभागाकडून सांगण्यात आले.

.      बोथली (वहा.) येथे समाजकल्यान विभागामार्फत संत गजानन मुलांचे वसतिगृह सुरू आहे. यात चोवीस विद्यार्थी चालू शैक्षणिक सत्रात होते. यातील काही दहावी – बारावीची परीक्षा संपाल्याने गावाकडे गेले. आता १४ विद्यार्थी वस्तीगृहात राहत आहेत. दिनांक २० मार्च २०२५ गुरवारला वस्तीगृहातील चौकीदार आठवडी बाजारात भाजीपाला व ईतर साहित्य खरेदी करायला गेले होते. यावेळी वस्तीगृहाच्या स्लापवर उलटी केली अन् बेडवर लघुशंका केली म्हणून या कारणाने लोकेश श्रावण भांदककर (१२) रा. साखरा या विद्यार्थ्यास याच वस्तीगृहात राहणाऱ्या चार विद्यार्थ्यांनी मिळून बेदम मारहाण केली. यात काठीने मारहाण केल्याचे उघडकीस आले.

.    या प्रकरणाची दखल चिमूरचे उपविभागीय अधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतली असून, पालकांना बोलावून विद्यार्थ्यांचे बयान घेण्यात आले होते. उपविभागीय अधिकारी यांचे दालनात पण पालकांचे मत जाणून घेण्यात आले असून, यात नेमक दोषी कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या वसतिगृहाचे अधीक्षक मागील १३ मार्च पासून रजेवर आहेत. यात एक चौकीदार आणि एक स्वयंपाकी महिला आहे. कधी कोणत्याही साहित्यासाठी चौकीदार बाहेर जातो तर अधीक्षक हे वरोरा वरून येजा करतात. त्यात त्यांच्या गैरहजर असण्याच प्रमाण जास्तच आहे. यामुळे असे प्रकार घडू नयेत यासाठी समाजकल्याण विभागानी ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

.      या सर्व प्रकरणाची चौकशी गटशिक्षणाधिकारी राकेश कांबळे यांच्या मार्गदर्शनात शिक्षण विस्तार अधिकारी यांनी चौकशी करून समाजकल्याण अधिकारी यांच्याकडे आज चौकशी अहवाल सोपवला या अहवालानूसार समाजकल्याण विभागाने आज सुनावणी ठेवली असून, पुढील कारवाई सूनवणी नंतर केली जाईल असे बोलतांना दैनिक नवजीवन प्रतिनिधी जवळ सांगितले.

error: Content is protected !!