खातोडा गावातील हत्तींनाला शेतशिवरातील घटना
नेरी : नेरीवरून जवळ असलेल्या खातोडा गावातील हत्तींनाला शेत शिवारात एका मोठया पट्टेदार वाघाने शेतात चारण्यासाठी बांधलेल्या दोन बैलावर दि 24 मार्चला दुपारी बारा वाजता हल्ला करून एकाला जागेवरच ठार केले तर दुसऱ्याला गंभीर जखमी करीत नरडी चा घोट घेतला यामुळे दुसराही बैल मरण्याच्या वाटेवर आहे. यामुळे शेतकऱ्यावर आस्मानी संकट कोसळले असून त्यांची धूर रिकामी झाल्याने शेती कशी करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे ? तेव्हा वनविभागाने नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
. सध्या रब्बी हंगामातील गहू पिकाची कापणी सुरू असून खातोडा येथील वामन गायकवाड हे शेतातील गहू कापनीसाठी सकाळी हतींनाला शेतशिवारातील शेतात गहू कापणीसाठी स्वतःचे बैल घेऊन गेले असता शेतात चरण्यासाठी बैलालबाधून गहू कापायला लागले. काही वेळानंतर जेवण करण्यासाठी बसले असता त्यांना जेवण झाल्यानंतर बांधीतून बाहेर आले असता मोटा पट्टेदार वाघ त्यांना नाल्यात जाताना दिसला तेव्हा त्यांनी बैलाकडे पाहिले असता बैल पडून दिसले जवळ जाऊन पाहिले असता एक बैल ठार झाला होता तर दुसरा गंभीर जखमी अवस्थेत दिसला त्यामुळे शेतकरी वामन गायकवाड यांचे काळीज थक्क झालेआणी एकच हंबरडा फोडीत डोक्यावर हात ठेवून रडू लागले त्यामुळे आजूबाजूचे मजुरवर्ग व शेतकरी जमा झाले त्यांनी सदर हृदयविदारक घटना पाहून थक्क झाले सदर वाघ हा नाल्या शेजारी दबा धरून बसला होता शेतमालक दूरच्या बांधीत गहू कापायला गेले असता मौका पाहून वाघाने हल्ला केला यावेळी चार बैल समोर बांधले होते यापैकी दोन दूर होते तर जवळील वामन गायकवाड यांच्या बैलाला ठार केले घटनेची माहिती गावात दिली असता त्यांनी वनविभागाला कळविली असता तात्काळ वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले मृतक बैलाचा आणि जखमी बैलाचा पंचनामा करून अहवाल वनविभागाला सादर केला यावेळी खातोडा व वडसी येथील पोलीस पाटील ग्रा प सद्स व अनेक नागरिक उपस्थित होते सदर घटनेमुळे बैल मालकावर दुःखाचे डोंगर कोसळले शेती कसण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तेव्हा तात्काळ नुकसानभरपाई वनविभागाने आपदग्रस्त शेतकऱ्याला द्यावी आणि वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्ग नागरिकांकडून होत आहे.


