सात लाख रुपयाचे नुकसान
चिमूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पच्या लगत असलेल्या बामनगाव येथील विकास धर्माजी मेश्राम यांच्या घरी घरगुती गॅस सिलेंडर चा स्फ़ोट झाला. यात घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाल्याची घटना दिनांक २४ मार्च ला दुपारी २:३० वाजताच्या दरम्यान घडली. जवळपास सात लाख रूपयाचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
. बामनगाव येथील विकास धर्माजी मेश्राम यांच्या घरी दुपारी २: ३० वाजताच्या दरम्यान चहा करण्यासाठी गॅस सुरु केली असता अचानक गॅस सिलेंडरचा स्फ़ोट झाला. घरातुन पळापळ सुरु झाली. आगीने भडका घेतला. व घरातील अन्न, धान्य, कपडे, जळून खाक झाले. तर आगीत १५ ग्रॅम सोनं व घरकुल बांधकामसाठी बँकेतुन आणलेले ७० हजार रूपये जळून खाक झाले.
. घटनेची माहिती मिळताच चिमूर वरून अग्नीशामक येऊन आग विजविण्यात आली. घटनास्थळी तलाठी यांनी येऊन पंचनामा केला. जवळपास सात लक्ष रूपयेचे आर्थिक नुकसान झाले. मेश्राम कुटुंबीयावर दुर्दैवी घटना घडली. एच पी गॅस सिलेंडर स्फ़ोट झाल्यामुळे प्रियंका गॅस एजन्सीचे मनिष तुंम्पलीवार, सरपंच गजानन गुळधे यांनी घटनास्थळी भेट दिली. तात्काळ प्रियंका गॅस एजन्सीचे मनिष तुंम्पलीवार यांनी आर्थिक मदत केली.


