सामाजिक कार्यकर्ते सुधीर मुडेवार यांची मागणी
भद्रावती : तालुक्यातील भोसरी फाटा ते खूटवंडा रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे नागरिक त्रस्त असून प्रशासन मात्र उदासीन असल्याचे चित्र दिसत आहे. रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अन्यथा नागरिकांच्या वतीने आंदोलन केले जाईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुधीर मुडेवार यांनी दिला आहे.
. रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये येत असून सुमारे तीन किलोमीटर लांबीच्या या रस्त्याचे डांबरीकरण व खडीकरण पूर्णतः उघडले असून रस्त्यावर जीव घेणे खड्डे पडले आहेत. गिट्टी अस्ताव्यस्त पडल्यामुळे वाहतुकीला खूप अडथळा निर्माण होत आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यानाच्या प्रवेशद्वाराकडे जाणारा हा मुख्य रस्ता असल्याने पर्यटक एसटी बस किंवा इतर वाहनाने मोठ्या प्रमाणात येने जाने करतात. मात्र रस्त्याची खूप दूरवस्था झाल्याने दुचाकी, सायकलस्वार चार चाकी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
. रस्त्याच्या निकृष्ट बांधकामामुळे आणि खराब अवस्थेमुळे वाहनांचे वाहन चालकांचे खूप मोठे नुकसान होत असून अपघाताचे प्रमाण वाढल्याचे भीती व्यक्त केली जात आहे. शालेय शालेय विद्यार्थी सामान्य नागरिक किंवा रोज त्या रस्त्याने जाणे येणे करणारे मजूर या समस्येमुळे खूप हैराण झाले आहेत. रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अन्यथा नागरिकांच्या वतीने आंदोलन केले जाईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुधीर मुडेवार यांनी दिला आहे.
. प्रशासनाने या कामाची लवकर दखल घेऊन रस्ता दुरुस्तीची उपाय योजना करावी अशी मागणी सुधीर मुडेवार यांनी केली आहे.


