Home सामाजिक वासेरा येथे “बाजारी विकलेली नार…” नाट्यप्रयोग

वासेरा येथे “बाजारी विकलेली नार…” नाट्यप्रयोग

1070

अनेक मान्यवरांची राहणार उपस्थिती

सिंदेवाही : पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना झाडीपट्टी संबोधल्या जाते. झाडीमध्ये अनेक कला, संस्कृती जोपासल्या जात असून खास करून झाडीपट्टी नाटकासाठी प्रसिद्ध आहे. सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथे आज १३ मार्च रोजी होळीच्या निमित्ताने नवनिर्मित रंगतरंग नाट्य कलाकृती वासेरा यांचे सौजन्याने शिवम् थिएटर्स नागभिड – वडसा प्रस्तुत युवराज गोंगले लिखित “बाजारी विकलेली नार..” अर्थात भाड्याची बायको या मराठी नाटकाचे सादरीकरण मेश्राम बंधू यांचे आवारात करण्यात येत आहे.

.      झाडीपट्टी मध्ये यावर्षी गाजत असलेले मध्यप्रदेशातील शिवपुरी भागात आजही महिलांचा बाजार भरवून जनावरांसारखी त्यांची बोली लावली जाते. या सत्य घटनेवर आधारित युवराज गोंगले यांनी नाटकाचे लेखन केले असून नाटकाचे गीत, संगीत, दिग्दर्शन स्वतः केले आहे. लोकांच्या आग्रहास्तव दोन महिन्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा त्याच स्टेजवर एक नवीन रेकॉर्ड कायम करीत वासेरा येथील मेश्राम बंधू यांचे आवारात ” बाजारी विकलेली नार अर्थात भाड्याची बायको या नाटकाचे सादरीकरण करण्यात येत आहे. सदर नाटकाचे उदघाटन खरेदी विक्री सहकारी संस्था सिंदेवाही चे अध्यक्ष प्रकाश पा. बनसोड यांचे अध्यक्षतेखाली चंद्रपूर येथील मच्छी ठेकेदार निताई बिश्वास यांचे हस्ते पार पडणार आहे. तसेच रंगमंच पूजक म्हणून जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस हरीभाऊ बारेकर, नवरगाव ग्राम पंचायत सरपंच राहुल बोडणे, महेश बोरकर, तर दिपप्रज्वलन यवतमाळ येथील डायलिसिस टेक्निशियन अरविंद सूर्यवंशी, एस. जी. एम.बँक मॅनेजर अमोल डोंगरवार, विदर्भ बचत निधी बँक सिंदेवाही सिंदेवाहीचे अध्यक्ष जीवन कोवले, शिवसेना विधानसभा प्रमुख ब्रम्हपुरी राकेश अलोणे, याशिवाय सर्वोदय विद्यालयाचे कर्मचारी लिखितराव उज्वावकर, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद कामडी, ठेकेदार रतीलाल शेंडे, आणि असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. तरी नागरिकांनी या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आणि मनोरंजनातून प्रबोधन करण्यासाठी उपस्थित रहावे. असे आवाहन मंडळाचे मुख्य संयोजक महेन्द्र कोवले, मॅनेजर हेमंत सूर्यवंशी यांनी केले आहे.

error: Content is protected !!