Home चंद्रपुर जिल्हा विशेष माढेळीतील पारस जिनिंगला भीषण आग

माढेळीतील पारस जिनिंगला भीषण आग

1067

91 लाखांचा कापूस जळून खाक

वरोरा : तालुक्यातील माढेळी येथील पारस जिनिंगमध्ये खरेदी केलेल्या कापसाला मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास आग लागली. यात सुमारे १३०० क्विंटल कापूस अंदाजे 91 लाख रुपये किमतीचा कापूस जळाल्याचा अंदाज जिनिंग मालक प्रकाशचंद मुथा यांनी वर्तवला आहे.

.     पारस जिनिंगमध्ये शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी आणले होते. कापसाची गाडी खाली करून वाहन निघून गेले. त्यानंतर कापसाला ट्रॅक्टर लोडरच्या सहाय्याने गंजी लावण्याचे काम सुरू होते. यावेळी अचानक लोडर बॅटरीमध्ये शार्टसर्किट झाल्याने गंजीला आग लागली. साठवलेल्या कापसातून अचानक आगीचा भडका उडाल्याचे जिनिंगमधील कामगारांना दिसले. त्यांनी लगेच ही माहिती मालकांना दिली. जिनिंगमधील पाण्याने आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला. तात्काळ नगर परिषद व जिएमआर कंपनीच्या अग्निशामक दलाला पाचरण करण्यात आले होते या अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली. आगीलगत असलेल्या कापूस गाठी त्वरित उचलण्यात आल्याने मोठे नुकसान टळले.

error: Content is protected !!