Home चंद्रपुर जिल्हा विशेष लग्नासाठी मुलगी मिळेना नैराश्यातुन युवकांची आत्महत्या

लग्नासाठी मुलगी मिळेना नैराश्यातुन युवकांची आत्महत्या

1082

वरोरा : तालुक्यातील लोणार (धोटे ) येथील एका 29 वर्षीय युवकांने लग्न जुळत नसल्यानं आत्महत्या केली आहे. वय उलटून जात आहे मात्र लग्नासाठी मुलगी मिळत नसल्यानं युवकांने टोकाचं पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना मंगळवारी सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान घडली. दिनेश सुरेश पाठक असे मृतक युवकांचे नाव आहे.

.       वरोरा तालुक्यातील लोणार (धोटे) या गावात वास्तव्यास असलेल्य दिनेश सुरेश पाठक याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. लग्न होत नसल्यानं काही दिवसांपासून तो चिंताग्रस्त होता. त्यानं आपली खंत मित्रांकडे बोलून दाखवली होती.

.      याबाबत माहिती मिळताच शेगाव येथील ठाणेदार योगेंद्र सिंग यादव यांनी आपला थापा पाठवून मृत युवकला विहिरी बाहेर काढण्यात आले यावेळी पोलीस उपनिरीक्षक महेंद्र शहारे, पोलीस उपनिरीक्षक ढोक, निषाद यादी कर्मचारी घटनास्थळी पोहचत मौका पंचनामा करण्यात आला पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला.

error: Content is protected !!