Home सामाजिक तपोभूमीत आमसभा उत्साहात

तपोभूमीत आमसभा उत्साहात

1018

असंख्य गुरुदेव भक्तांची उपस्थिती

नेरी : चिमूर तालुक्यातील नेरी जवळील विदर्भातील पंढरी समजली जाणारी आणि राष्ट्रसंताच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तपोभूमी गुंफा गोंदेडा येथे दि 9 मार्चला विविध विषयांवर आणि गुंफा यात्रा महोत्सवाला झालेल्या खर्चाचा आढावा घेण्यासाठी असंख गुरुदेव भक्तांच्या भाविकांच्या उपस्थितीत आमसभा उत्साहात संपन्न झाली.

.       सदर आमसभा ही गुंफा यात्रा महोत्सव समितीचे अध्यक्ष दिवाकर नीलकंठ पोफारे अध्यक्षतेखाली घेण्यात आली सदर सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचन करण्यात आले तसेच गुंफा यात्रा महोत्सवाला आलेल्या खर्चाचे तपशीलवार माहिती देण्यात आली तसेच तपोभूमीवर झालेल्या बांधकामा ची माहिती देण्यात आली मागील वर्षी झालेल्या कार्यक्रमाची माहिती देऊन तपशील सांगण्यात आला यानंतर जानेवारी मध्ये झालेल्या तपोभूमी गुंफा यात्रा महोत्सव चा खर्चाचा हिशोब सादर करून सर्वानुमते मंजूर करण्यात आला यानंतर पुढील कार्याची रुपरेषा ठरवून वर्षभर होणाऱ्या कार्यक्रमाचे नियोजन ठरविण्यात आले तसेच महाराजांच्या कार्याची प्रचार आणि प्रसार यावर सुद्धा चर्चा करण्यात आली आणि नवीन गुरुदेव सेवकांची नेमणूक करण्याचा ठराव पारीत करण्यात येऊन अर्ज मागविण्यात सुरवात करण्यात आली.

.       यावेळी व्यासपीठावर गुंफा समिती अध्यक्ष विठ्ठल सावरकर, वाघ महाराज प्रचार प्रमुख गुरुकुज मोझरी आश्रम राजूभाऊ देवतळे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ शाम हटवादे जिल्हाधिकारी चंद्रभान शेंडे सचिव नथु भोयर कोष्यध्यक्ष प्रा भास्कर वाढई चरडे गुरुजी गिरजाबाई गायकवाड सरपंच पांडुरंग अडसोडे प्रकाश सोनुने भोजराज कामडी रत्नमाला सोनूले कमल गुळधे मंगला डांगे दिवाकर शेरकुरे विनोद बारसागडे करुणा गुरनुले दिवाकर शेंडे कन्हैया भौण्ड वामन बोरकर एकनाथ बोरकर प्रशांत आदनसरे प्रदीप जेंगते विनोद हटवादे आदी सह अनेक मान्यवर उपस्थित होते या सभेचे संचालन प्रा भास्कर वाढई यांनी केले तर आभार सावरकर सर यांनी मानले या सभेला असंख्य गुरुदेव भक्त भाविक तसेच गावकरी मंडळींनी हजेरी लावली होती.

error: Content is protected !!