एक शिक्षकी शाळा मात्र विविध उपक्रम
शिक्षिका मंदा नंदनवार यांचा सन्मान
सिंदेवाही : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गडमौशी येथे मुलांच्या बौद्धिक विकासाबरोबर मुलांमधील सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका मंदा नंदनवार यांनी बाल आनंद मेळावा आयोजित केला असून या निमित्ताने शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने मुख्याध्यापिका मंदा नंदनवार यांना शाल, श्रीफळ व साडी भेट देऊन सत्कार करण्यात आला.
. उपक्रमाच्या माध्यमातून मुल शिकू शकतं” हा तीन दशकाचा अनुभव असल्यामुळे विविध उपक्रम शालेय स्तरावर आयोजित करुन ,बालकाच्या सर्वागिण विकासाला दिशा देता आली. शाळेची उपक्रमशीलता सातत्याने टिकून ठेवण्यासाठी, पालक ,शिक्षण मित्र व विद्यार्थी यांचे योगदान मोलाचे ठरले . शिक्षण हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक महत्त्वाचं असं ज्ञान आहे बुद्धिमत्ता आहे. पण प्रत्येकाने घेतलं तर वेगवेगळ्या मार्गावरती आज वेगवेगळ्या बुद्धिमत्तेच्या जोरावर ती आज प्रत्येक व्यक्ती ही प्रत्येक ठिकाणी आपला ठसा उमटवत आहेत. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषी विज्ञान केंद्राच्या वेलांदी मॅडम तसेच प्रमुख पाहुणे शा.व्य. अध्यक्ष नितीन तोडासे, सरपंच सोनाली ताई पेंदाम ,माजी सरपंच’ सचिन नाडमवार, पोलिस पाटील मनिषा मंडलवार उपस्थित होते.कार्यक्रम मोठ्या आनंदाने पार पडला. गावकरी यांनी बाल आनंद मेळाव्यात विविध प्रकारच्या पदार्थाचा आस्वाद घेतला आणि समाधान व्यक्त केले.
. ८ मार्च जागतीक दिन निमित्याने. जि.प. प्राथ. शाळा गडमौशी येथील शाळा व्यवस्थापन समिती ने विविध कार्यक्रम घेऊन, शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करीत असल्याने शिक्षिका मंदा नंदनवार यांचा शाल,श्रीफळ व साडी देऊन सत्कार करण्यात आला.मंदा नंदनवार शिक्षिका यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. शालेय व्यवस्थापन समिती विकास वाढविण्याच्या दृष्टिकोनातून फार मोलाचे कार्य केलेले आहे. एवढेच नव्हेतर त्यांनी स्वच्छतादूत उपक्रम,शालेय बाग निर्मिती, फळझाडे लागवड व परिसर सजावट,लोकसहभागातून डिजिटल शाळा निर्मिती, अनेक शालेय उपक्रम, विद्यार्थी बचत बँक, शालेय वस्तू भांडार,मुलांची हस्तलिखित लेखन प्रकाशन,सांस्कृतिक संमेलन, बाल आनंद मेळावा आधी प्रकारात अनंत कार्य केलेले आहेत.त्यांनी पल्स पोलिओ जनजागृती, वृक्षारोपण, पाणपोई, व गरजूंना मदत, बालकांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सातत्याने प्रयत्नशील असतात.एक शिक्षकी शाळा असून सुद्धा विविध प्रकारच्या उपक्रमाचे आयोजन शाळा व्यवस्थापन समिती यांच्या सहकार्याने करण्यात येत आहे. हे विशेष.
. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने बक्षीस म्हणून’ टिफीन बॉक्स व पाण्याची बॉटल’ देण्यात आले. तसेच जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गटलिडर महिला व कर्तृत्ववान स्त्रियाचा सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी कार्य करण्यासाठी शा.व्य.स उपाध्यक्ष मनोज वासेकर, राजेंद्र मेश्राम, प्रविण निके, रिना ठाकूर, मनोरमा गुंतीवार, पिंकी बोईनवार, सुनिता नेवारे, लता नेवारे व प्रकाश अलोने सर्वांनी मोलाचे सहकार्य करून सहकार्य केले.


