तातडीने बोलावली शेतकर्यांच्या शिष्ट मंडळाची बैठक
वरोरा : शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन वरोरा येथील रत्नमाला चौकात शेतकरी नेते किशोर डुकरे यांचे दिनांक 10 मार्च सोमवार ला राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करणार असल्याची माहिती एका पत्रकाद्वारे शासन प्रशासन यांना माहिती देण्यात आली. या पत्राने प्रशासनात चांगलीच खळबळ माजली असून शुक्रवारी शेतकरी व संबंधित अधिकारी यांची तात्काळ बैठक तहसील कार्यालयात घेण्यात आली.
. शेतकरी नेते किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात 10 मार्च ला चंद्रपुर नागपुर महामार्गावरील वरोरा येथील रत्नमाला चौकात शेतकर्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शेकडो शेतकर्यांना घेऊन महामार्ग रोखो आंदोलन छेडण्याबाबत तहसीलदारांमार्फर मुख्यमंत्री, पालकमंत्री, ऊर्जामंत्री यांना निवेदन देण्यात आले. तर प्रतिलिपी म्हणून खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस स्टेशन, कृषी कार्यालय, विज वितरण कंपनी यांना पाठविण्यात आले. त्या पत्रा अनुषंगाने दिनांक 5/3/2025 रोजी पोलीस निरीक्षक वरोरा यांच्यामार्फत शेतकरी शिष्टमंडळाची बैठक लावण्यात आली होती, या बैठकीमध्ये पोलीस प्रशासनाकडून शेतकरी शिष्टमंडळाला कळविण्यात आल्या की, आमच्या वतीने सर्व विभागांना पत्र व्यवहार केलेला आहे त्यामुळे तुम्ही हे आंदोलन थांबवावे, मात्र शेतकरी नेते डुकरे यांचे समाधान झाले नसून आदी शेतकर्यांचे विषय मार्गी लावा. नंतरच आंदोलन मागे घेऊ असा ईशारा दिला. त्यामुळे प्रशासनात खळबळ माजली व उपविभागीय अधिकारी यांच्या नेतृत्वात शुक्रवार दि 7 रोजी निवेदनातील विषयावर संबंधित विभागातील अधिकारी यांना बोलावून तहसीलदार वरोरा यांच्या अध्यक्षते खाली शेतकरी शिष्ट मंडळाची आढावा बैठक लावण्यात आली. मात्र संबंधित विभाग यांच्या कडून शेतकरी शिष्टमंडळ यांना असे कळविण्यात आले कि निवेदनातील सर्व विषय हे कॅबिनेट मंत्री मंडळाचे असल्यामुळे संबंधित विषयावर आम्ही तोडगा काढू शकत नाही असे म्हणणे संबंधित विभागाचे पडले त्यामुळे शेतकरी जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही, शेतकऱ्यांच्या या ठाम भूमिकेवर प्रशासन काय भूमिका घेतील या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
. या आढावा बैठकीला कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सचिव चंद्रसिंग शिंदे, तालुका कृषी विभागाकडून डोईफोडे, वीज वितरण कंपनीकडून उपविभागीय अभियंता बदकल, तर सहाय्यक उपनिबंध म्हणून दिवसे तर शेतकरी शिष्ट मंडळ म्हणून शेतकरी नेते किशोर डुकरे, शेतकरी तुकाराम निब्रड, मनोज काळे, तुलसी आलम, अरविंद झाडे यादी शेतकरी उपस्थित होते.


