Home सामाजिक बैल जोडी छकडा हाकलत नवरदेव पोहचला लग्न मंडपात

बैल जोडी छकडा हाकलत नवरदेव पोहचला लग्न मंडपात

1093

नवरदेव पाहण्यासाठी नागरिकांनी केली मोठी गर्दी

अनोख्या एंट्रीने सारेच अवाक

नवरदेवाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

रवी खाडे

 चंद्रपूर :

 ” माझ्या मामाची रंगीत गाडी हो
तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो
कशी दौडत दौडत येई हो
मला सासरी घेऊन जाई हो…”

.         सध्या लग्नाचा हंगाम सुरु झाला. लग्नात काय वेगळं करता येईल यासाठी अनोख्या पद्धतीनं लग्न सोहळे आयोजित केले जात आहेत. काही ठिकाणी नवरदेव हेलिकॉप्टरमधून तर कोणी घोड्यावर, उंटावर बसून तर कुणी महागड्या अलिशान गाड्यातून लग्नाला दाखल होत असल्याचं पाहायला मिळतं.. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथील एक अधिकारी युवक चक्क छकडा हाकलत लग्न मंडपात पोहचला. या नवरदेवाला पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याकडेला मोठी गर्दी केली होती.

.       भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथील माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रमेश तिखट यांचा भाचा व शेतकरी कुटुंबातील आकाश वसंत लांबट यांचे शुक्रवारी वरोरा येथे लग्न होते. आकाश हा गुजरातच्या अहमदाबादमध्ये एल अँड टी कंपनीत सहाय्यक व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहे. आकाश मोठ्या पदावर असल्याने साहजिकच नवरीच्या कुटुंबाला नवरदेव अलिशान गाड्यामधून पोहोचेल, अशी अपेक्षा होती. मात्र, चक्क छकडा हाकलत नवरदेव लग्न मंडपात पोहचला आणि सगळेच पाहत राहिले. या अनोख्या एंट्रीने या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहेत. आधुनिक काळाती दिखाव्यापासून दूर राहत पारंपारिक पद्धतीनं बैल जोडी हाकलत नवरदेव पोहोचला बैलांना देखील सजवण्यात आलं होतं. या प्रसंगाने अनेकांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या असून या बैल जोडी छकडा हाकलणाऱ्या नवरदेवाचे फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

error: Content is protected !!