Home चंद्रपुर जिल्हा विशेष वाघाच्या बंदोबस्तासाठी अखेर वनविभागाकडून लावले पिंजरे

वाघाच्या बंदोबस्तासाठी अखेर वनविभागाकडून लावले पिंजरे

1077

⭕ ट्रॅप कॅमेरे आणि लाईव्ह कॅमेरे लावून वाघाचा बंदोबस्त करा

⭕ वासेरा गावातील नागरिकांची जोरदार मागणी

सिंदेवाही : जगविख्यात असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील शिवणी वनपरिक्षेत्रातील वासेरा येथे मागील आठ दिवसापासून बिबट्याचा धुमाकूळ सुरू असताना आता पट्टेदार वाघाचा संचार सुरू झाला आहे. याबाबत दैनिक नवजीवन कडून वृत्त प्रसारित होताच वनविभागाकडून वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी अखेर पिंजरे लावण्यात आले असून ट्रॅप कॅमेरे किंवा लाईव्ह कॅमेरे लावून पट्टेदार वाघाचा कायमचा बंदोबस्त करावा अशी गावकऱ्यांनी मागणी केली आहे.

.     शिवणी वनपरिक्षेत्रातील वासेरा येथे मागील आठ दिवसापूर्वी बिबट्याने गावातील कोंबड्या, बकरे, यांचा फडशा पडला आहे. तर गावातील अनेक नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. अशातच सोमवारी रात्री दोन ते अडीज चे सुमारास बस स्टँड चौकात पट्टेदार वाघाचे आगमन झाले. बस स्टँड चौकात वाघाने जोरदार आरडाओरड सुरू करून दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न केला असताना वनविभागाकडून फटाके फोडून त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न झाला आहे. दैनिक नवजीवन ने याबाबत वृत्त प्रकाशित केल्यानंतर अखेर वासेरा गावातील बस स्टँड चौकात, धनंजय कनिष्ठ महाविद्यालयाजवळ पिंजरे लावून वाघाचा बंदोबस्त करण्याचा वनविभागाकडून प्रयत्न सुरू झाला आहे. मात्र नुसतेच पिंजरे न लावता अगोदर ट्रॅप कॅमेरे किंवा लाईव्ह कॅमेरे लावून वाघाचे ठिकाण लक्षात आणून नंतरच पिंजरे लावून वाघाचा बंदोबस्त करावा. अशी गावकऱ्यांनी मागणी केली आहे.

error: Content is protected !!