नराधम अटकेत
पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
सिंदेवाही : पोलिस स्टेशन सिंदेवाही अंतर्गत येत असलेल्या रत्नापूर येथे एका ६ वर्षाच्या चिमुकलीवर 28 वर्षाच्या नराधमाने अतिप्रसंग केल्याची घटना सोमवारी घडली . किशोर मधुकर दडमल (२८) असे नराधम आरोपीचे नाव असून अवघ्या काही तासातच त्या नराधमाला सिंदेवाही पोलिसांनी अटक केली आहे.
. पोलीस सूत्रानुसार फिर्यादीच्या तोंडी तक्रारी वरून पीडित मुलगी ही आपल्या अंगणात खेळत असताना आरोपी किशोर मधुकर दडमल वय २८ याने पीडित मुलीला अंगणातून घरात नेले. आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीच्या तोंडी तक्रारीनुसार पोलिस स्टेशन सिंदेवाही येथे अपराध क्रमांक ५३/२०२५ कलम ६५ (२) भारतीय न्याय संहिता सह कलम ४, १२ पोक्सो अन्वये गुन्हा नोंद करून आरोपी किशोर दडमल यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.
. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक चंद्रपूर, अप्पर पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी ब्रम्हपुरी, पोलिस निरीक्षक विजय राठोड ठाणेदार पोलिस स्टेशन सिंदेवाही यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक प्रेमनाथ ठवकर, नापोअ नारायण येगेवार, मपोअ शुभांगी भांडेकर, हे तपास करीत आहेत.


