महाराष्ट्र अनिस चा मार्गदर्शन व संवाद कार्यक्रम
नागभीड : आम्ही संविधानानुसार काम करतो. संविधानानुसार प्रत्येकाला त्याच्या धर्मा नुसार आचरण करण्याचा अधिकार आहे. महा. अनिस हे समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचे काम करते. समाजातील लोकांचे जे शोषण आणी दिशाभूल करतात त्या विरुद्ध महा. अनिस काम करते. जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी असे आम्हाला वाटते. भोंदूबाबा हे दिशाभूल करून जनतेला लुटत आहेत. त्या साठी हा लढा आहे. कोणतीही गोस्ट कारणाशिवाय घडत नाही. या मागे चमत्कार नाही.तरुण आणी लहान मुलात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र अनिस च्या मुक्ता दाभोळकर यांनी केले.
. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा नागभीड येथे कार्यकर्त्यांसोबत मार्गदर्शन व सवांद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. आनंद बुद्ध विहार नागभीड येथे मुक्ता दाबोळकर, विजया श्रीखंडे, रामभाऊ डोंगरे, प्रा. युवराज मेश्राम, हरिभाऊ गरफडे यांच्या उपस्थितीत भगवान बुद्ध, रायतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न्य ड्रॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून वंदना घेण्यात आली. यावेळी राज्यकार्यकारिणी सदस्या विजया श्रीखंडे, राज्यकार्यकारिणी सदस्य रामभाऊ डोंगरे यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख मार्गदर्शन करताना मुक्ता दाबोळकर पुढे म्हणल्या की, आपण सारे वैज्ञानिक युगात जगतो. चमत्कारामागे वैज्ञानिक कारण आहे. आपल्या बुद्धीला पटते ते स्वीकारा कोणी सांगतो म्हणून विस्वास ठेवू नका. कार्यकर्ता हा अभ्यासू असायला पाहिजे. त्याच्या मध्ये करुणा असायला पाहिजे. नरेंद्र दाबोळकर सांगायचे की क्रोधापेक्षा करूनची गरज असते आणी उपहासा पेक्षा आपुलकीची गरज असते हे गुण कार्यकर्त्यात असावे असे मोलाचे मार्गदर्शन केले.
. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिसचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ गरफडे यांनी केले. संचालन सचिव अरुण पेंदाम यांनी केले तर आभार विविध उपक्रम विभाग आनंद मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाला अनेक महिला, नागरिक, महा. अनिसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हरिभाऊ गरफडे, अरुण पेंदाम, अमृत शेंडे, गीता खापर्डे, शासिकला खोब्रागडे यांचेही मोलाचे योगदान लाभले.


