Home सामाजिक ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा कौटुंबिक स्नेहमिलन सोहळा

ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा कौटुंबिक स्नेहमिलन सोहळा

1112

सेवानिवृत्त ग्रा.पं. अधिकारी वाकडे यांना निरोप

सिंदेवाही : ग्रामपंचायत अधिकारी संघटना तालुका सिंदेवाही यांच्या वतीने नुकताच ग्रामपंचायत अधिकारी यांचा कौटुंबिक स्नेहमिलन सोहळा घेण्यात आला असून या निमित्ताने नुकतेच सेवानिवृत्त झालेले ग्रामपंचायत अधिकारी शामराव वाकडे यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तर नवनियुक्त ग्रामपंचायत अधिकारी राजेश खनके, सुमित मुन, आशिष ढुमने, पल्लवी बोरकुटे यांचा स्वागत तथा सत्कार करण्यात आला.

.     सिंदेवाही पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या भेंडाळा फाट्याजवळील सामाजिक वणीकरनाचे रोपवण या निसर्गरम्य स्थळी नुकताच पार पडलेल्या ग्रामपंचायत अधिकारी संघटना कौटुंबिक स्नेहमिलन सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूरचे प्रकल्प संचालक गिरीष धायगुडे, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आत्मज मोरे, ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटरचे व्याख्याता प्रदीप पांढरबडे, सहाय्यक गट विकास अधिकारी विभावरी तितरे, ग्राम पंचायत अधिकारी संघटना जिल्हा सरचिटणीस पुंडलीकराव ठाकरे, विस्तार अधिकारी (पंचायत) राजेश शेंडे, इत्यादी मंचावर उपस्थित होते. यानिमित्ताने अनेक मान्यवर पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन ग्रामपंचायत अधिकारी अशोक शिंदे, प्रास्ताविक ग्राम पंचायत अधिकारी राजेश लोणारे, तर ग्रामपंचायत अधिकारी, दिवाकर येरमलवार यांनी सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.

.       कार्यक्रमाचे यशस्वितेकरिता ताराचंद मानकर, योगेश बारेकर, अतुल मेश्राम, अमोल वाळके, गजानन मानकर, हरीहर गुरनुले तथा समस्त ग्रामपंचायत अधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.

error: Content is protected !!