Home सामाजिक माजरीतील ९० घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्र

माजरीतील ९० घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्र

1101

माजरी : राज्यामध्ये ग्रामीण गृहनिमाण अंतर्गत १०० दिवसीय महाआवास अभियान दिनांक १ जानेवारी २०२५ ते १० एप्रिल २०२५ या कालावधीत राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भारत सरकार यांच्या शुभहस्ते व मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे प्रमुख उपस्थितीत महा आवास अभियान सन २०२४-२५ अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ मधील राज्यातील २० लक्ष लाभार्थ्यांना घरकुलाचे मंजूरी पत्र देण्यात आले आहे.

.     या माध्यमातून ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या प्रभावी गतीमान, दर्जेदार अंमलबाजावणी व लोकसहभागासाठी प्रभावीपणे महाआवास अभियान राबविण्यात आला आहे. १० लक्ष घरकुल लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरणाच्या कार्यक्रम शनिवारी (२२ फेब्रुवारी ) दुपारी ४.४५ वाजता मुख्य बॅडमिंटन हॉल, श्री शिव छत्रपती क्रिडा संकुल, बालेवाडी, पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे ग्रामपंचायत, तालुका व जिल्हास्तरावरुन थेट प्रक्षेपण दूरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात आले.

.      या पार्श्वभूमीवर घरकुल लाभार्थ्याच्या मंजुरी पत्र वितरण व पहिला हप्ता वितरण कार्यक्रमासाठी शनिवारी माजरी ग्रामपंचायतीच्या आवारात ग्रामसभाचे आयोजन करण्यात आले. दरम्यान माजरी ग्राम पंचायतीच्या हद्दीतील सर्व लाभार्थी परिवारासह व ग्रामस्थ उपस्थितीचे नियोजन करण्यात आले. दरम्यान पुण्यात झालेल्या कार्यक्रमाची माजरी ग्रामपंचायतीत थेट प्रक्षेपण दूरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात आले. दरम्यान माजरीतील ९० घरकुल लाभार्थ्यांना सरपंच छाया जंगम व ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र गणवीर, उपसरपंच सोनाली सूर यांच्या हस्ते मंजुरीची पत्रे देण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य हॅनसन राव, रवि भोगे, विशाल जाधव आदी उपस्थित होते.

स्वतःचे घर असावे अशी प्रतीक्षा असलेल्या स्वप्नातील घर पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून मला मंजुरी पत्र देण्यात आले. ही माझ्या कुटुंबीयांसाठी आनंदाची बाब आहे.                                                                                                                                            किशोर कवडूजी ढगे,                                                             घरकुल लाभार्थी, माजरी

 घरकुल लाभार्थ्यांनी घराचे बांधकाम करत असताना बिले काढून देण्याच्या नावाने जर कोणीही पैशाची मागणी करत असेल तर लाभार्थ्यांनी थेट ग्रामपंचायतला तक्रार द्यावी.                                                                                                                                                                         राजेंद्र गणवीर,                                                     ग्रामपंचायत अधिकारी, ग्रा. पं. माजरी

error: Content is protected !!