Home चंद्रपुर जिल्हा विशेष आमदारांनी टोचले अधिकार्‍यांचे कान धडाका पाहून सुटला घाम

आमदारांनी टोचले अधिकार्‍यांचे कान धडाका पाहून सुटला घाम

1081

कोरपना येथे आढावा बैठक

सात तास सखोल विभागवार झडती

कोरपना : तालुक्याची विभागवार धडाकेबाज आढावा बैठक आमदार देवराव भोंगळे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृह कोरपना येथे पार पडली. यात प्रत्येक विभागाचा तपशीलवार समाचार घेऊन तालुक्याच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.

.     यात पाणीपुरवठा, सिंचन, बांधकाम, आरोग्य, विद्युत, पंचायत, कृषी, शिक्षण, वन, तहसील, भूमी अभिलेख, बस आगार, स्थानिक स्वराज्य संस्था आदी विभागाचा विस्तृतपणे सखोल आढावा कोरपना च्या आजवरचे इतिहासात पहिल्यांदाच घेण्यात आला. संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील घोळ या संदर्भात त तातडीने सखोल चौकशी करून संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी सूचना जिल्हाधिकारी यांना करण्यात आली. तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मध्ये मागील डिसेंबर महिन्यापासून शालेय पोषण आहार मिळत नसल्याचे लक्षात येताच. त्याच क्षणी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना भ्रमणध्वनी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची विनंती आमदारांनी केली.यासोबत कोरपना, गडचंदुर बस स्थानकाचा प्रश्न , रस्ते ,पिण्याच्या पाण्याची सोय,बस सेवेतील अडचणी, तीर्थक्षेत्र विकास, लाभार्थ्यांचे रखडलेले अनुदान, मांडवा प्राथमिक आरोग्य केंद्र, विश्रामगृहांचे आधुनिकीकरण नवीन सिंचन प्रकल्प निर्मिती साठी जागेचा शोध व जुन्या सिंचन प्रकल्पाची व्यापी वाढवण्यासाठी उपाययोजना सह अनेक प्रलंबित प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांना तातडीच्या योग्य सूचना केल्या. या आढावा बैठकीला नायब तहसीलदार प्रवीण चिडे, करिष्मा वासेकर, मुख्याधिकारी येमाजी धुमाळ, सर्व विभागप्रमुख, भाजपा तालुकाध्यक्ष संजय मुसळे, सतीश उपलेंचीवार, अरुण मडावी, आबिद अली,अमोल आसेकर, अरुण डोहे, किशोर बावणे, आशिष ताजने, पुरुषोत्तम भोंगळे, शशिकांत आडकीने, प्रमोद कोडापे, विजय रणदिवे आदी उपस्थित होते.

नागरिकांशी सौजन्य वागा                                                                                                                                                                तहसील कार्यालय, पंचायत समिती, पोलीस स्टेशन व विविध कार्यालयामध्ये नागरिकांना सन्मान जगात वागणूक द्या अशी नागरिकांच्या समस्या आपल्या कार्यालयात तात्काळ सोडवा नागरिकांना विटीत जाऊ नका असे आदेश आमदाराने आपल्या आढावा बैठक मध्ये दिले.

जप्ती मध्ये असलेली रेती घरकुलधारकांना द्या                                                                                                                                      कोरपना तहसील कार्यालयामध्ये जप्ती असलेली रीती घरकुल धारकांना देण्याचा आदेश आमदारांनी दिले तसेच गोरगरीब भरपूर धारकांनी त्या रितीसाठी अर्ज करून रेती घ्यावी अशी अशी माहिती आमदारांनी दिली.

थेट मंत्र्यांना फोन                                                                                                                                                                        कोरपना पंचायत समिती येथे आमदार देवराव भोंगळे यांनी आढावा बैठक घेतली यामध्ये नागरिकांची समस्या निराकरण करतांनी त्यांनी थेट मंत्र्यांसह मंत्रालय मंत्रालयामध्ये सचिवांना फोन करून तात्काळ समस्यांचा निराकरण केलं तसेच ही बैठक सात ते आठ तास चालली यामध्ये अनेक नागरिकांचे समस्यांची निराकरण करण्यात आले तसेच आमदार यांनी अधिकाऱ्यांना थेट वार्निंग देत नागरिकांचे समस्या तात्काळ निकाली काढा अशी व नागरिकांना सौजन्य पूर्ण वागणूक द्या अशी तंबी अधिकार्याला देण्यात आली.

error: Content is protected !!