Home सामाजिक कुचना येथे शिवजयंती उत्साहात साजरी  

कुचना येथे शिवजयंती उत्साहात साजरी

1095

कुचना : युवा शिव महोत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कुचना येथे साजरी करण्यात आली.

.     प्रथमता महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून पालखीमध्ये स्थानापन्न केली. त्यानंतर गावातील भजन मंडळी व शालेय विद्यार्थी तसेच गावातील नागरिक उपस्थित राहून शिवगर्जना व शिवघोषाच्या गजरात गावातून शोभायात्रा काढण्यात आली. तसेच शिव महोत्सव मंडळाच्या वतीने शालेय गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

.     शिवजयंती उत्सवाला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कुचना गावचे सरपंच सुचिता ताजणे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून सोमसेटवार, गणपत महातळे, देवराव अवतरे, पोलीस पाटील योगिता बंड, आशा ताजणे, प्रफुल ताजणे, कानोबा तिखट , पल्लवी परचाके ,बल्की,पिंपळकर या सर्व मान्यवरांनी आपल्या भाषणातून शिवाजी महाराजांचे विचार मनामध्ये रुजवून आचरणात आणणे आजची काळाची गरज आहे असे विचार व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमाला गावातील समस्त नागरिक व विद्यार्थी गण कार्यक्रमाला उपस्थित होते.

.     कार्यक्रमाचे संचालन मेश्राम यांनी केले तर आभार महातळे यांनी मानले. त्यानंतर विद्यार्थ्यांचे  सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. व संध्याकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता युवा शिव मंडळाचे अध्यक्ष मनोज तिखट, महेश ताजणे, अतुल परचाके, निसर्ग वानखेडे, सागर बोंडे, विशाल मंगाम, मंगल वानखेडे, राहुल दुरुडकर, महेश गिलबिले, राकेश दुरुडकर व त्यांच्या संपूर्ण टीमने मोलाचे सहकार्य केले व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. तर माजरी, नागलोन, पळसगाव याठिकाणी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गाव स्वच्छ करून, गावात रॅली काढून गावातील मुलांचे भाषण आणि गायन स्पर्धा घेऊन महाराजांचे कार्य उजागर करण्यात आला.

error: Content is protected !!