Home सामाजिक शिवजयंती निमित्त वासेरा येथे संविधान युवा मंचचे खीरदान वाटप

शिवजयंती निमित्त वासेरा येथे संविधान युवा मंचचे खीरदान वाटप

1112

सिंदेवाही : रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी अठरा पगड जातीना सोबत स्वराज्य निर्माण करणारा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे ३९५ व्या जयंतीचे औचित्य साधून संविधान युवा मंच वासेरा यांचे वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात खीरदान वाटप करण्यात आला असल्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार जोपासण्याचे काम केले आहे.

.        छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ ऐतिहासिक व्यक्तिमत्व नाही. तर ते एक विचार, एक तत्त्वज्ञान, आणि प्रेरणादायी नेतृत्व होते. त्यामुळे महाराजांना खऱ्या अर्थाने जाणण्याचा प्रामाणिक प्रयत्न झाला पाहिजे. जयंतीदिनी मोठमोठ्या घोषणा केल्या जातात. महाराजांचा जयजयकार करून घोषणांनी आसमान दणाणून टाकले जाते. मात्र महाराजांचा वारसा टिकला जाईल, अशा कृतीद्वारे त्यांचा विचार रुजवणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची कार्यशैली केवळ भूतकाळातच मर्यादित नाही. तर ती वर्तमान आणि भविष्यासाठीही मार्गदर्शक आहे. आज समाजात भ्रष्ट्राचार , अन्याय, महिलांवरीलं अत्याचार, राजकीय स्वार्थ, आणि सामाजिक विषमता मोठ्या प्रमाणात दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच गोष्टी विरोधात संघर्ष केला होता. म्हणूनच महाराजांचे अनुयायी म्हणून त्यांचे विचार रुजविण्यासाठी संविधान युवा मंचच्या वतीने सायंकाळी 7 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात खीरदान वाटप करण्यात आले. सर्व प्रथम छ. शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करण्यात आले. तसेच सरपंच दिलीप मेश्राम यांचे हस्ते डॉ.पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

.          यावेळी संविधान युवा मंचचे कार्यकर्ते बुद्धीसागर कोवले, विल्सन कोवले, अनिकेत गोडबोले, समाधान कोवले, किशोर बोरकर, अनुप कोवले, महेंद्र कोवले, संघरत्न बनसोड, तथागत कोवले, बंडू मेश्राम, राहुल कोवले, अजित खोब्रागडे, प्रजय कोवले, अतिनील सूर्यवंशी इत्यादी उपस्थित होते. गावातील जाणता राजा शिव महोत्सव समितीच्या वतीने काढण्यात आलेली शोभायात्रा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पोहचताच अनेकांनी महाराजांना अभिवादन करून खिरीचा मनमुराद आस्वाद घेतला आहे.

error: Content is protected !!