Home सामाजिक महाराष्ट्र आरोग्यमित्र कर्मचारी संघटनेचे बेमुदत धरणे आंदोलन

महाराष्ट्र आरोग्यमित्र कर्मचारी संघटनेचे बेमुदत धरणे आंदोलन

1345

वरोरा : एकत्रित महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनाचे कार्यरत आरोग्यमित्र यांचे दिनांक 18 पासून राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलन सुरू झाले आहेत.

.      तरी राज्य आरोग्य हमी सोसायटी (SHAS) व सहाय्य संस्था (TPA) यांनी आरोग्यमित्राच्या मागण्यांवर लवकरात लवकर निर्णय घेऊन आरोग्यमित्रांना न्याय द्यावे अशी विनंती पूर्वक निवेदन आरोग्यमित्रांकडून देण्यात आले आहेत.  आरोग्यमित्र हे पदविधर असून, योजनेचे योग्य कौशल्य असलेले तसेच रुग्णाचे योग्य समुपदेश करणे. हे सर्व काम आरोग्यमित्र करीत असतो. त्यामुळे दिनांक 23.08.2024 ला जीवनदायी भवन मुंबई येथे झालेल्या बैठकीत सुद्धा सीईओ सर यांनी आश्वासन दिले परंतु त्यावर काही निर्णय घेण्यात आले नाही त्यामुळे आरोग्यमित्र संघटनेकडून पत्रव्यवहार करण्यात आले त्यावर सुद्धा shas व TPA ने काहीच निर्णय घेतले नाही. म्हणून दिनांक 20.01.2025 ला संघटनेकडून संपाची घोषणा 12.02.2025 ला करण्यात आली होती. परतू shas व TPA ने दिनांक 7.02.2025 ला जीवनदायी भवन मुंबई येथे बैठक झाली त्यात सुद्धा 10 दिवसाची वेळ मागण्यात आली.

error: Content is protected !!