Home सामाजिक शिवजयंतीनिमित्त घोनाडमध्ये रायगडाच्या मेघडंबरीची प्रतिकृती

शिवजयंतीनिमित्त घोनाडमध्ये रायगडाच्या मेघडंबरीची प्रतिकृती

1080

विविध उपक्रमांनी शिवजयंती उत्साहात साजरी

भद्रावती : तालुक्यातील घोनाड येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यंदा गावातील युवकांनी रायगडावरील ऐतिहासिक मेघडंबरीची भव्य प्रतिकृती साकारत शिवरायांना अभिवादन केले. २०२३ मध्ये विशाल गड, २०२४ मध्ये प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती उभारल्यानंतर यंदा आणखी भव्य निर्मितीचा संकल्प करण्यात आला होता. ६ वर्षापासून संकल्प चालू आहे.

.     शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला गावातील युवकांनी श्रमदान करत संपूर्ण गाव स्वच्छ केले. शिवरायांच्या पालखीसोहळ्यात ‘जय जिजाऊ, जय शिवराय’च्या जयघोषात पदावली भजन मंडळाने उत्साह आणला. गावातील शाळेतील विद्यार्थिनींनी लेझीमच्या तालावर मिरवणुकीत हजेरी लावत सोहळ्याला विशेष रंगत आणली. गावातील महिला, पुरुष, युवक, युवती आणि बालगोपाळ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

.     रात्री दीपोत्सवाने वातावरण प्रकाशमान झाले. त्यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. सलग सहाव्या वर्षी घोनाड गावाने शिवजयंतीचा उत्सव अनोख्या उपक्रमांनी साजरा केला. भविष्यातही डॉल्बी वा डिजेच्या गोंगाटाशिवाय शिस्तबद्ध आणि पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.

error: Content is protected !!