भद्रावती : नवोदय स्पोर्टींग क्लब भद्रावती च्या वतीने दिनांक २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान किल्ला वार्ड येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेच्या मैदानावर पुरुषांच्या भव्य खुल्या व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २१ रोज शुक्रवारला सायंकाळी ६ वाजता आमदार करण देवतळे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
. या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेते मुकेश जिवतोडे, माजी नगराध्यक्ष अनील धानोरकर, नगर परिषदेचे माजी उपनराध्यक्ष प्रफुल चटकी, जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रमोद आवडते, जिल्हा व्हॉलीबॉल संघाचे सचिव सुनील आखाडे आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघांना रोख आकर्षक बक्षिसांनी गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेचा लाभ शहर तथा परीसरातील व्हॉलीबॉल प्रेमिंनी घ्या असे आवाहन प्रफुल चटकी यांनी केले आहे.


