सिंदेवाही : सर्वोदय महाविद्यालय सिंदेवाही येथील राष्ट्रीय सेवायोजना शिबिर मौजा विरव्हा येथे 10 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी दरम्यान ‘सशक्त भारताच्या निर्मितीसाठी व डिजिटल साक्षरतेच्या प्रसारासाठी युवकांची भूमिका’ ही संकल्पना घेऊन विशेष शिबीर घेण्यात आले.
. यावेळी शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी अध्यक्षस्थानी विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष योगेंद्र जयस्वाल तर उद्घाटक म्हणून विरव्हाच्या सरपंच छाया चौधरी, महा. प्राचार्य डॉ. राजेश डाहारे, जि. प. उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तामदेव कावळे समाजसेवक रामदास शेंडे, पो.पा. राजेंद्र सावसाकडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना शिबिर हे सुसंस्कृत विद्यार्थी निर्माण करण्याचे आणि आनंदी जीवन जगण्यासाठी माणसात स्वावलंबन हा गुण निर्माण करण्याचे व शिक्षणासोबतच समाज सेवा करणे हे या शिबिरातून शिकता येते असे मत प्रास्ताविकेत प्राचार्य डहारे यांनी व्यक्त केले.
. तसेच शिबिरात उदबोधन वर्गाचे आयोजन केल्या गेले होते. यात ‘राष्ट्रीय सेवा योजना व व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर मा. डॉ. प्रेम कुमार खोब्रागडे, आणि ‘विद्यार्थी जीवनात खेळाचे महत्व या विषयावर डॉ. लेमदेव नागलवाडे, यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आरोग्य शिबिर व एनिमिया तपासणी साठी आरोग्य विभाग स्वास्थ केंद्र सिंदेवाहीची चमू आली. तर रात्रीला डॉक्टर सतीश चिंतावार यांनी आरोग्य विषयी जनतेला संबोधित केले. याशिवाय ‘जलसाक्षरता व जल संवर्धन’ या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी गट विकास अधिकारी पंचायत समिती सिंदेवाही आत्मज मोरे, प्रा. अशोक भोसले प्रा. चेतना अगडे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले तसेच ‘ग्रामीण भागातील लोकांसाठी राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची माहिती’ देण्यासाठी सेवानिवृत्त विस्तार अधिकारी गुन्तिवार व डॉ. मदारे, सर्वोदय महाविद्यालय सिंदेवाही हे उपस्थित होते.
शिबिरात विविध विषयावर घेण्यात आलेल्या पथनाट्य, नाटिका, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती, प्रबोधन व मनोरंजनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांची मने जिंकली. समारोपीय कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून विद्या प्रसारक संस्थेचे सचिव अरविंद जयस्वाल प्रमुख अतिथी म्हणून विद्या प्रसारक संस्थेचे कोषाध्यक्ष गीतांजली जयस्वाल, प्रा. डॉ. राजेश डाहारे, रामदास शेंडे, पो. पा. सावसाकडे, सरपंच चौधरी, ग्राम सचिव शेंडे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. डाहारे यांनी केले. तर संचालन हर्षा मेंडुलकर तर आभार डॉ. शेख यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रा. उके, प्रा. आडे, प्रा. प्रफुल्ल रणदिवे, डॉ. विनय त्रिपदे, प्रा. अशोक भोसले, प्रा. तुकाराम बोरकर, प्रा. सुनील गभने, प्रा. अगडे, प्रा. अर्पना कोवे, प्रा. मेश्राम, प्रा. रामटेके, प्रा. पिसे, प्रा. तुमराम, प्रा. वरभे, डॉ. राठोड, प्रा. रूपा बोरकर, प्रा. सायली पालकर व महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी व विरव्हा गावातील जनतेचे सहकार्य लाभले.


