Home चंद्रपुर जिल्हा विशेष चंद्रपूरात भीषण आगीत संपूर्ण घर जळून खाक

चंद्रपूरात भीषण आगीत संपूर्ण घर जळून खाक

1095

गॅस सिलेंडरचा झाला स्फोट 

अंकलेश्वर गेट जवळील घटना

चंद्रपूर : घरात कोणी नसताना दुपारच्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यामुळे घराला लागलेल्या आगीत घर बेचिराख झाले असून संसारपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. सदरची घटना चंद्रपूर शहरातील अंचलेश्वर गेटजवळ असलेल्या एका बंद घरात घडली आहे. स्फोट झाला यावेळी सुदैवाने घरात कोणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

.      चंद्रपूर शहरातील अंचलेश्वर गेटजवळ गर्ल्स कॉलेजच्या समोर असलेल्या संगीता हांडे यांचे हे घर आहे. संगीता हांडे यांची मुलगी बारावीला असल्याने सध्या तिची परीक्षा सुरु आहे. आज देखील पेपर असल्याने संगीत हांडे यांनी घरातील सर्व कामे आवरली. यावेळी मुलगी पेपर देण्यासाठी घरातून निघाली. या पाठोपाठ संगीता या देखील घराला कुलूप लावून कामासाठी बाहेर पडल्या होत्या. याच वेळी सदरची घटना घडली.

.      दरम्यान घर बंद असताना सिलेंडरमधून गॅस लीक होऊन स्फोट झाला. यामुळे घराला आग लागली होती. दरम्यान आजूबाजूच्या लोकांना घरातून धूर निघत असल्याचे दिसून आले. यानंतर परिसरातील नागरिकांनी आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाला दिल्यावर अर्ध्या तासानंतर अग्निशामक बंब घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत घरातील सर्व सामान जळून राख झाले होते. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले. गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने संपूर्ण घर जळून राख झाले. या गरीब महिलेच्या घरातील संपूर्ण साहित्य जळाले असून लाखो रुपयाचे नुकसान झाले आहेत. सुदैवाने आग लागली तेव्हा महिला कामावर गेली होती. तर मुलगी पेपर द्यायला गेली होती. यामुळे सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. मात्र आगीत घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे.

अर्ध्या तासानंतर अग्निशामक वाहन दाखल                                                                                                                                         घराला अचानक लागल्याने आजूबाजूच्या लोकांना घरातून धूर निघत असल्याचे दिसून आले. आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाला दिली असताना सुद्धा अर्ध्या तासानंतर अग्निशामक वाहन घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत घरातील सर्व सामान जळून खाक झाले होते. सध्या उन्हाळ्याची चाहूल लागल्याने अग्निशामक वाहन तत्पर असायला पाहिजे होते. मात्र उशिरा अग्निशामक दलाचे वाहन  आल्याने नागरिकांनी मनपाच्या अग्निशामक विभागावर रोष व्यक्त केला.

error: Content is protected !!