Home चंद्रपुर जिल्हा विशेष वातावरणातील बदलाने रुग्णसंख्येत वाढ

वातावरणातील बदलाने रुग्णसंख्येत वाढ

1124

शासकीयसह खासगी रुग्णालयांमध्ये गर्दी

खांबाडा : वातावरणातील चढ-उतारांमुळे सध्या सर्दी, खोकला अन् तापाच्या रुग्णांत वाढ होताना दिसत आहे. सकाळच्या प्रहरी कडाक्याची थंडी, दुपारी ऊन आणि सायंकाळी झोंबणारे वारे यामुळे रुग्णसंख्येत वाढ होत असून, दवाखाने फुल्ल झाले आहेत.

.      सध्या काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये हिमवृष्टी होत आहे. त्यामुळे पूर्वेकडून दक्षिणेकडे थंड वारे वाहात आहेत. परिणामी दक्षिण भारतात थंडीची लाट आहे. बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मागील महिन्यात ढगाळ हवामानामुळे आजारपणांत वाढ झाल्याचे दिसून आले होते.

.    आहारात वाढत असलेल्या’ फास्ट फूडने रोगप्रतिकारकशक्ती घटत आहे. त्यामुळे वातावरणात बदल झाल्यास व्हायरल इन्फेक्शनचा धोका वाढतो. ज्येष्ठांपासून लहानग्यापर्यंत सर्वांनाच व्हायरलचा धोका वाढला असल्यामुळे दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. विशेषतः लहान मुलांना सर्दी, खोकल्यासह ताप येण्याचे प्रमाण वाढले आहे. मुलांमध्ये अंगात कणकण, हातपाय दुखणे, डोकेदुखी असे आजार दिसत आहेत. अशा प्रकारची लक्षणे जाणवत आहे पण शासनाने गोरगरीबांच्या कल्याणासाठी मोठी शासकीय आरोग्य यंत्रणा उभी केली, त्यात खेडोपाडी मलेरीया वर्कर, आरोग्यसेविका तथा सोबत आशावर्कर यांनी यांनी नेहमी गृहभेटि करणे गावात रुग्ण आहे ते शोधणे, पाण्याचे नमुणे घेणे, नेहमी दरमहिण्यात गरोदर माताना लसीकरण व कुपोषीत शिशू यावर उपचारासाठि नजीकच्या आरोग्यकेन्द्रावर उपचार करणेसाठी सल्ला देणे हे कार्य असताना मात्र आजघडीला कोणीहि फिरकत नसल्याचे निदर्शनात येत असल्याने बोलले जाते.

error: Content is protected !!