नेल्सन हॉस्पिटल नागपुर येथे उपचार सुरू
आरोग्य विभाग अलर्ट
भद्रावती तालुक्यात सर्व्हेच्या सूचना
भद्रावती : काही दिवसापूर्वी पोंभूर्णा तालुक्यात गुलेन बॅरी सिंड्रोम (जिबीएस) चा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर आता त्याचे लोन भद्रावती तालुक्यातही पोहचले आहे. नुकताच सागरा येथे आणखी एक रुग्ण सापडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हा रुग्ण सात वर्षांचा मुलगा असून, त्याला नागपूर येथील नेल्सन हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.
. भद्रावती तालुक्यात सापडलेल्या जिबीएसच्या रुग्णामुळे तालुक्यातील आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. आरोग्य विभागाकडून गावागावात घरोघरी सर्व्हेच्या सुचना दिल्या आहे. दरम्यान संबंधित रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. पहिला रुग्ण १२ वर्षीय मुलगी पोंभूर्णा तालुक्यातील ठाणेवासना येथील असून, ती बरी झाली आहे. तिला रुग्णालयातून सुटी देण्यात आली, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कटारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत शुक्रवारी दिली. चंदनखेडा आरोग्य केंद्रामार्फतीने पोलिओसाठीचे सर्वेक्षण करण्यात आले. दरम्यान, या मुलाची प्रकृती बिघडलेली असता त्याला नागपुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यात असलेली लक्षणे बघता तपासणी करण्यात आली. यात त्याला जीबीएसची लागण झाल्याने निष्पन्न झाले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. सागरा गावातील २८७ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये १५ वर्षांखालील मुलांचा समावेश होता.
या आजाराची लक्षणे अचानक पायातील किंवा हातातील येणारी कमजोरी, चालताना त्रास, अशक्तपणा, बोलताना अन्न गिळताना अडचण येणे असे या आजारचे लक्षणे आहे.
काय उपाययोजना केल्या पाहिजे सर्वांनी स्वच्छ पाणी प्यावे, शिळे अन्न खाऊ नये, भाजी स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन खावे, उघळ्यावरील पदार्थ खाऊ नये, पाणी उकळून प्यावे, स्वच्छतेबाबत दक्षता बाळगावी,
सदर रूग्णाला नेल्सन हॉस्पिटल येथे उपचारार्थ सुरू असून रुग्णाच्या प्रकृती मध्ये सुधारना आहे. डॉ. संजय आसुटकर, तालुका आरोग्य अधिकारी, भद्रावती


